डोंबिवलीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
- CT INDIA NEWS

- Oct 29, 2019
- 1 min read

वार्ताहार-आशिष चव्हाण मुंबई....कु. परिनीता देसाई डोंबिवलीतून बेपत्ता क्राईम बॉर्डर (वार्ताहर):डोंबिवली येथून कु.परिनिता शंकर देसाई वय १३ वर्षे ६ महिने राहणार: मोहिनी को-ऑ.हौ. सोसा. ४था मजला रूम नं.१८,सी. एम. एस .स्कूल समोर आनंद नगर डोंबिवली (पश्चिम) येथून दिनांक :२० ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घरातून कामानिमित्त बाहेर गेली असून अद्यापपावेतो ती घरी आलेली नाही. त्यासंदर्भात तिचे वडील शंकर अनंत देसाई वय वर्ष ५० धंदा शेअर ट्रेडिंग यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात त्यासंदर्भात तक्रार नोंदविली असून विष्णुनगर पोलीसांनी मानव मिसिंग गु. रजि. क्र. २१४/२०१९ भा. दं. वि.कलम ३६३ प्रमाणे तक्रार दाखल करुन घेतली आहे . बेपत्ता असलेल्या कु.परिनीता देसाई चे वर्णन मध्यम बांधा उंची ५ फूट ,४ इंच , रंग गोरा, चेहरा गोल ,नाक सरळ ,केस काळे ,डोळे काळे ,अंगात तिने काळा चॉकलेटी रंगाचा कुर्ता व काळ या रंगाची लेगीज पॅन्ट परिधान केलेली आहे .तिला मराठी व हिंदी या भाषा येतात .कृपया कुणाला कु. परिनीता आढळल्यास त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा .पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असे तपास अधिकारी पो. उप.निरी. ए.बी. मस्के यांनी कळविले आहे. संपर्क: ९७६३६७२६१३







Comments