डॉ.शिरोडकर हायस्कूल मध्ये1985 (बॅच) स्नेह समारंभ
- CT INDIA NEWS

- Dec 3, 2019
- 1 min read

वार्ताहार-आशिष चव्हाण मुंबई दिनांक 30 - 11 - 2019 रोजी के.एम्.एस्. ज्युनियर कॉलेज माजी विद्यार्थांचा ( 1985 बॅच ) स्नेह समारंभ तब्बल 33 वर्षांनी डॉ.शिरोडकर हायस्कूल , परेल , मुंबई - १२ येथे आयोजित केला गेला त्यात सौ.राजश्री पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले तसेच समारंभ आणि सर्वांना एकत्रित करण्याची बहुमोल कामगिरी , सौ.विजया गुंडे - गोसावी आणि सौ.विजया लुडबे यांनी पार पाडली तद्प्रसंगी केक कापून जल्लोष करण्यात आला आणि , बऱ्याच माझी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत तसेच पुढील कार्यक्रमाचा आढावा सांगितला , यात सुनील लाड , आशिष चव्हाण , हेमंत घरत , प्रबोधन लोकेगावकर , राजश्री पाटील , विजया गुंडे - गोसावी , अरुणा जैतपाळ यांनी जून्या आठवणींना तब्बल 33 वर्षांनी उजाळा दिला आणि सद्य परिस्थिती व त्या काळची परिस्थिती यावर थोडक्यात आढावा घेतला.







Comments