तुटलेला रेल्वे रूळ दाखवल्या मुळे महेंद्र कुकलारे यांचा सत्कार
- CT INDIA NEWS

- Oct 29, 2019
- 1 min read

वार्ताहर मनीष मुथा लासूर स्टेशन :- ८ वाजून २० मिनिट ह्या वेळी स्वरूपचंद कुकलारे हे शेतात काही कामा निमित्त गेले व त्यांच्या लक्षात आले कि रूळ तुटलेले आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाल म्हणजे महेंद्रला फोन करून सांगितले व महेंद्र ने मनीष मुथाला फोन केला कि रेल्वे ट्रकमध्ये काही फॉलट आहे तेव्हा मनीष मुथाने त्यांना विचारले कि नेमके काय फॉलट आहे तेव्हा कुकलारेने सांगितले रूळ तुटले आहे तेव्हा मनीषने सांगितले कि फोटो पाठवा व पिल्लर वर काय कि.मी नंबर आहे. तेव्हा त्याने सांगितले ८२/४-५ हि माहिती मनीष मुथा ला मिळाली व त्याने स्टेशन मास्टर शैलेंद्र भैय्या ला सांगितले शैलेंद्र भैय्या ने पी डब्ल्यू ऑफिस च्या नवल मीना यांना फोन करून सांगितले कि ८२/४-५ या ठिकाणी जाऊन तुम्ही रुळाची तपासणी करा. नवल मीना यांनी सर्व तपासणी केली व तेथील काम पूर्ण करून ९.०० ला पूर्ण काम झाले त्यांना फोन केल आता तुम्ही COUTION ORDER देऊ शकता. लासूर स्टेशन चे शैलेंद्र भैय्या यांनी सर्व प्रथम सचखंड सुपर फास्ट एक्स्प्रेस कॉशन ऑर्डर देण्यात आली. लासूर स्टे चे CT INDIA न्यूज वार्ताहर मनीष मुथा, लोकमत समाचार चे लासूर स्टेशन वार्ताहर जैस्वाल काका व स्टेशन मास्टर शैलेंद्र भैय्या यांना कुकलारे यांनी वेळेवर सांगितले म्हणून महेंद्र कुकलारे यांचा सत्कार करण्यात आला.







Comments