*तांबोळे येथील नेत्ररोग तपासणी शिबीरात 110 ग्
- CT India News
- Mar 10, 2022
- 1 min read
_चाळीसगाव ता. प्रतिनिधी : विकी पानकर मो. 8605074861
_
*तांबोळे येथील नेत्ररोग तपासणी शिबीरात 110 ग्रामस्थांची तपासणी दिगंबर भाऊ कुमावत युवा मंचाच्या आदर्श उपक्रम*
जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद डोळ्या समोर ठेवून कोणत्याही बडे जाब पणा न करता गेल्या काही दिवसांपासून दिगंबर भाऊ कुमावत कौतुकास्पर्श कार्य करीत आहेत*
ताबोळे येथे 110 जणांची नेत्र तपासणी तांबोळे ता. चाळीसगाव येथे मारूती मंदिरात दिगंबर भाऊ कुमावत युवा मंचतर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिर उत्साहात झाले यावेळी 110 ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्या त्यामधून इतर रुग्णांची शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली त्यांना मालेगाव येथे रवाना करण्यात आले येथे विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. रोटरी आय हॉस्पिटलच्या नेत्र तज्ञांनी मार्गदर्शन केले समाजसेवक विशाल धनगर यांनी परिश्रम घेतले दिगंबर भाऊ कुमावत यांचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक होत आहे गेल्या अनेक दिवसापासून गावात कुठल्याही प्रकारे नेत्रतपासणी शिबिर झालेलं नव्हते दिगंबर भाऊ कुमावत यांनी उमेदवारी घेऊन पुढे यावे असे देखील या वेळेस काही ग्रामस्थ म्हणाले. त्या वेळी उपस्थित म्हणून ग्रामसेवक आर व्ही पाटील. सामाजिक कार्यकर्ते रोहित जाधव. ग्रामपंचायत सदस्य संभाजी शिंदे, शंकर पाटील, किशोर पाटील, साहेबराव कोल्हे,स्वप्नील पाटील, नितीन कुमावत, सचिन कुमावत, इतर ग्रामस्थ उपस्थित होते.*
Comments