तुमचे लोक ऐकत नाही त्यामुळे माझी मान शरमेने खाली झाली
- CT INDIA NEWS

- Apr 20, 2020
- 2 min read

औरंगाबाद : वार्ताहार -सचिन चौधरी( महा ब्युरो चिप )- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली यावेळी अनेकांनी तुमचे लोक ऐकत नाही अशी तक्रार केली, तेव्हा माझी मान शरमेने खाली गेली, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले. कोरोनाचा धोका ओळखा, तुमच्या हालगर्जपणामुळे तुमचा तर जीव धोक्यात जाईलच, पण घरातल्या इतरांना याचा अधिक धोका आहे. अजूनही वेळ गेली नाही लॉकडाऊनचे पालन करा, घराबाहेर पडू नका असे आवाहन जलील यांनी केले. औरंगाबाद शहरात कोरोना बाधितांची संख्या 30 वर पोहचली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या शहराचे समावेश रेड झोनमध्ये केला आहे.कोरोना बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुस्लिमबहुल भागात आढळून आले आहेत. या भागातील लोक लॉकडाऊनचे नियम पाळत नसून सर्रासपणे घराबाहेर पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत देखील याचे पडसाद उमटले. गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर खासदार इम्तियाज जलील यांनी ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत त्या भागाला भेट दिली. या ठिकाणच्या नागरिकांना आवाहन करताना जलील म्हणाले, गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तुमचे लोक ऐकत नाही अशी तक्रार सगळ्यांनी केली, तेव्हा मला शरमेने मान खाली घालावी लागली. माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच ही लाजीरवाणी बाब आहे. सरकार, पोलीस, आरोग्य यंत्रणा आपल्याला कोरोनाचा धोका समजावून सांगत आहेत. मात्र आपण बेफिकीरपणे घारबाहेर पडत आहोत. पोलीस आले की पळून जायचे आणि पोलीस गेले की घोळक्याने चौकात उभे रहायचे. असले प्रकार बंद करा. कोरोनाचे रुग्ण किराडपुरा, बयाजीपुरा, आरेफ कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनी या भागातूनच अधिक का आढळत आहेत याचा जरा विचार करा ? रोजच्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाहेर पडावे लागते हे मान्य असले तरी घरातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडणे अपेक्षित आहे. पण सगळेच बाहेर पडले तर कोण कोरोना घेऊन परतेल याचा नेम नाही. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कृपया घराबाहेर पडू नका. असे आवाहन जलिल यांनी केले. घरीच नमाज आदा करावा पुढील आठवड्यात रमझान सुरु होत आहे. त्यामुळे सर्वांनी घरातच नमाज आदा करावी, फळ खरेदी करण्यासाठी गर्दी करू नका. शहरातील परिस्थिती सुधारली आणि रुग्ण संख्या शून्यावर आली तर आपण लॉकडाऊन हटवण्याची मागणी करु शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.







Comments