top of page

*तेली उत्सव समितीच्या वतीने महिलांचा सत्कार* कारंजा (घा)/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर. कारंजा (घा ):-म

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 10, 2022
  • 1 min read

*तेली उत्सव समितीच्या वतीने महिलांचा सत्कार*


कारंजा (घा)/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर.


कारंजा (घा ):-महिला दिनाचे औचित्य साधून संताजी तेली उत्सव समिती कारंजा च्या वतीने कारंजा येथील नवनिर्वाचित नगरपंचायत च्या नगरसेविका श्रीमती रंजना शांतारामजी ढबाले, सौ सुवर्णा अजय कावडकर, वैशाली गजानन सरोदे, यांचा संताजी यांची प्रतिमा व भेटवस्तू देऊन संताजी तेली उत्सव समिती कारंजा तर्फे कस्तुरबा विद्यालयाचे पर्यवेक्षक हिरामन रेवतकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप टिपले, बिहाडी चे माजी सरपंच विनोद धांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे वर्धा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रुपेश मस्के, चेतन लोखंडे, रुपेश तुकाराम मस्के, अजय कावडकर, गजानन सरोदे, प्रवीण ढबाले, उपस्थित होते यावेळी संताजी उत्सव समिती कारंजा च्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांना महिला दिनाच्या व पुढील सामाजिक राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments


bottom of page