दिनांक १९/ १२ /२०२१ रोजी गौताळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री . ज्ञानेश्वर दे
- CT India News
- Dec 20, 2021
- 2 min read
प्रेस नोट
आज दिनांक १९/ १२ /२०२१ रोजी गौताळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री . ज्ञानेश्वर देसाई चाळीसगाव (वन्यजीव) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी त्यांचे कर्मचारी वनरक्षक आर जी तडवी , उमेश सोनवणे , तसेच वनमजुर राजाराम चव्हाण, नितीन राठोड , यांना घटनास्थळी पाठविले. या ठिकाणी काही इसम अवैधरित्या चंदनाची वृक्षतोड करताना आढळून आले. या लोकांशी झालेल्या झटापटीत एक आरोपी नामे नवनाथ विठ्ठल पोकळे 32 वर्षे राहणार लोढरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यास जेरबंद करून अटक करण्यात कर्मचारी यशस्वी झाले. उर्वरित तीन ते चार चंदन तस्कर कर्मचाऱ्यांवर दगडफेक करीत घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले . हे सर्व आरोपी पाटणा वनपरिक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक 305 मध्ये मौल्यवान चंदन वृक्षाच्या अवैध वृक्षतोड करून त्याचा गाभा काढताना आढळून आले होते . यावेळी आरोपी कडून ओला चंदन गाभा 2 किलो 500 ग्रॅम व वृक्ष तोडण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे ( करवत , टॉमी , कुऱ्हाड , ) जागेवरून जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय चाळीसगाव समोर उभे केले असता त्यास दिनांक 22 /12/2021 पर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. ही कार्यवाही माननीय अमित कुमार मिश्रा भावसे उपवनसंरक्षक , माननीय डॉ . राजेंद्र नाळे विभागीय वन अधिकारी, श्रीमती आशा चव्हाण सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव कन्नड, माननीय राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वर देसाई वनपरिक्षेत्राधिकारी वन्यजीव चाळीसगाव, आर जी तडवी, उमेश सोनवणे, एन. जी.सोनवणे, डी के जाधव , अजय महिरे , शुभम राठोड , मेघराज चव्हाण , गणेश राठोड ,नितीन राठोड , बापू आगोणे , उपलवाड , अनिल शितोळे , मोरे , आदींनी केली .
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास श्री ज्ञानेश्वर देसाई वनपरिक्षेत्राधिकारी चाळीसगाव वन्यजीव हे करीत आहेत .









Comments