top of page

दारू आणि तांबखु चोरट्या मार्गाने विक्री

  • Writer: CT India News
    CT India News
  • Apr 13, 2021
  • 1 min read

*लॉकडाऊन पार्श्वभूमीवर तंबाखू, गुटखा, दारू यांचे वाढले भाव.चोरट्या मार्गाने सुरू आहे अवैध वाहतूक. अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.*


जामनेर (प्रतिनिधी) चव्हाण विठ्ठल


महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने आता लॉक डाऊन करण्याच्या दिशेने पाऊल उचलले असून येत्या 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात कडकं निर्बंध सह लॉक डाऊन लागण्याची शक्यता आहे.


अशातच मागच्या लॉक डाऊन मध्ये नागरिकांना तंबाखू, गुटखा,दारू यांच्या खरेदी साठी 5 पटीने किंमत मोजून विकत घ्यावे लागत होते.


यावेळी मात्र लॉक डाऊन अगोदरच तंबाखू, गुटखा व दारू यांची जास्तीच्या भावाने बाजारात विक्री सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे.या सर्व वस्तूंची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.


यावेळी अन्न व औषध प्रशासनाने लक्ष घालून या सर्व मालांची कोणत्याही प्रकारची जास्तीच्या भावाने बाजारात विक्री होणार नाही या कडे लक्ष द्यावे. तसेच ज्या ठिकाणी जास्तीची किंमत आकारण्यात येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.त्याच प्रमाणे लॉक डाऊन काळात तहसीलदार यांनी सील करावे म्हणजे काळा बाजार यांना करता येणार नाही. अशी मागणी जनतेतून होत आहे.

Comments


bottom of page