दिव्याग्यांचे तोंडबंद लॉक आंदोलन
- CT INDIA NEWS

- Jun 4, 2020
- 1 min read

वार्ताहार-संदीप इंगळे- औरंगाबाद--–*दिव्यांगांचे तोंड लॉक आंदोलन*
गेल्या सत्तर दिवसापासून लॉक डाऊन चालू आहे
दिव्यांगांना शासनाकडून मदतीचा अनेक घोषणा करण्यात आल्या परंतु त्या घोषणा ची अंमलबजावणी झाली नाही.
संपूर्ण संचारबंदी चालू असल्याने अनेक उद्योग व्यवसाय बंद आहेत
परावलंबी असणाऱ्या दिव्यांगांच्या हाताला काम नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने विविध घटकांना अनेक योजना लागू केल्या.
परंतु सर्वात गरीब व उपेक्षित असणाऱ्या दिव्यांगांना एकही योजना मिळाली नाही.
शासनाच्या आहे त्याही योजनांची अंमलबजावणी झाली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेत कडील पाच टक्के निधी , औरंगाबाद मनपा कडील दिव्यांग मासिक मानधन योजना, जिल्हा दिव्यांग कल्याण निधी, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे ,जिल्हा अपंग कल्याण पुनर्वसन समिती स्थापना, अपंग बीज भांडवल कर्ज योजना सह दिव्यांगांच्या 5% निधीमधून घरकुल योजना रद्द करून दिव्यांगांचे पुनर्वसन किंवा थेट मासिक मानधन योजना लागू करावी।.
इत्यादी मागण्या सह इतर योजनांची अंमलबजावणी गेल्या तीन महिन्यापासून झाली नाही .
लॉकडाऊनचे कारण सांगून जिल्ह्यातील 45000 दिव्यांगांचे तोंड बंद करून बोलू दिले जात नाही . शेवटी काम ही नाही आणि शासनाची ही मदत नाही अशा परिस्थितीमध्ये दिव्यांगांची उपासमार होत असून जीवन आणखी हलाखीचे बनत चालले आहे . करिता शासनाने व प्रशासनाने दिव्यांगांच्या हालअपेष्टांची दखल घेऊन मागणी केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी करावी. या निषेधार्थ दिनांक मंगळवार 9 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रहार अपंग क्रांती औरंगाबाद तर्फे *दिव्यांगांचे तोंडलॉक आंदोलन* करण्यात येणार आहे
जिल्हाभरातील सर्व दिव्यांगांचे पालकत्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडे असते. जिल्ह्यातील सर्व योजनांचे कंट्रोल हे जिल्हा समाज कल्याण अधिकार्याकडे असते .याबाबत आज प्रहारचे जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी गाडे यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री केंद्रे साहेब यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले व या सर्व विभागांना आपण पत्र काढावे अशीही विनंती करण्यात आली.







Comments