top of page

देशी कट्यासह एकास अटक

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jul 6, 2021
  • 1 min read

CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी मनीष मुथा. . पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे,अमोल ढाकणे, यांच्यासह शिल्लेगाव पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई केलीअसून

आरोपीचे नाव विजय गंगाराम आल्हाट वय २० वर्षे रा.वारी ता.कोपरगाव जिल्हा.अहमदनगर असे आहे.

गंगापुर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल ढाकणे यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील आरापूर येथे एक युवक देशी रिव्हॉल्वर सोबत घेऊन फिरत असल्याचे सांगितले उपनिरीक्षक ढाकणे व पोलीस अंमलदार मनोज औटे,अनिल दाभाडे यांनी तात्काळ आरापूर गाठले मात्र सदर युवक आढळून आला नाही. मात्र आज पुन्हा दुपारी दोन वाजेच्या सुमारास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की लासुर स्टेशन येथे काल पळालेला युवक देशी रिव्हॉल्वर सोबत घेऊन फिरत असल्याचे सांगितले सदर युवक पिवळ्या रंगाचा गोल गळ्याचा टी/शर्ट घातला असून मुंबई/नागपूर महामार्गावरील कांदा मार्केटच्या शेजारील गट नंबर ३९ 3मध्ये एक युवक संशयितरित्या फिरत असल्याचे आढळले त्याने पोलीसांना पाहताच पळू लागला मात्र पोलिसांनी सीनेस्टाईल पाठलाग करून व योग्य तो बाळाचा वापर करून त्यास पकडले. सदर जागेवर काय करतो असे विचारल्यावर त्याने उडवा उडवी ची उत्तर दिल्यावर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी रिव्हॉल्वर,मॅगझीन आढळून आले. व त्याचा परवाना विचारला असता विनापरवाना तो शस्त्र बाळगत असल्याचे समजले त्यास नाव विचारले असता विजय गंगाराम आल्हाट वय वर्ष २० रा.वारी ता.कोपरगाव जिल्हा अहमदनगर असे सांगितले.

दरम्यान सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, उपनिरीक्षक सतीश दिंडे, बिट अंमलदार कैलास राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मनोज औटे,विठ्ठल जाधव,मनोज नवले, दादाराव तिडके,सचिन चव्हाण, आनंद पाटील आडसुळे यांनी केली आहे .

Comments


bottom of page