नागपुर मुंबई हायवे वर गायके पेट्रोल पंपासमोर स्विप्ट डिझायर झाडाला धडकुन एक जन ठार तर एक जन जख्मी .
- CT India News
- Jan 12, 2021
- 1 min read
लासूर स्टेशन CT INDIA NEWSप्रतिनिधी मनिष मुथा
नागपुर मुंबई हायवे वर गायके पेट्रोल पंपासमोर स्विप्ट डिझायर झाडाला धडकुन एक जन ठार तर एक जन जख्मी ....
गंगापुर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हाद्दीतील लासुर स्टेशन येथील नागपूर मुबंई महामार्गाने औरंगाबाद येथून येताना गायके पेट्रोल पंप समोर गाडी वरून तोल सुटल्याने गाडी झाडाला अदाळुन रस्त्याच्या दहा फूट खाली गेली व गाडी चकनाचुर झाली यामध्ये एक जन ठार तर एक जन गंभीर जखमी झाले उपचारा दरम्यान माजीत शहा (कादरी) या युवकाचा मुत्यु झाला शाई चव्हाण या युवकांवर उपचार चालू आहे
सावंगी .लासुर स्टेशन ता गंगापूर येथील माजीत रज्जाक शहा (कादरी) (वय 30) वर्षे व साई मधुकर चव्हाण (वय 21 )वर्ष हे दोन्ही मित्र सिप्टडीझर गाडी नं एम एच 46 पी. 4572 दि 9 शनिवारी रोजी काही कामा निमित्त तसेच खरेदी करण्यासाठी औरंगाबाद येथे गेले होते काम आटपून खरेदी केली औरंगाबाद हुन नागपूर मुबंई महामार्गाने लासूर स्टेशन कडे येताना मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास देवळी जवळील गायके पेट्रोल पंपां जवळ गाडीवरील ताबा सुटला गाडी ड्रायव्हर साईट ने झाडाला अदाळुन रस्त्याच्या कडेला अंदाजे दहा फुट खोल गेली यामध्ये गाडी चा चकनाचुर झाला या घटनेची माहिती एका अज्ञात इसमांने नातेवाईकांना कळवले नातेवाईक तात्काळ घटना स्थळी दाखल होऊन दोघांना हि उपचारासाठी औरंगाबाद खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान माजीत रज्जाक शहा (कादरी) याचा मुत्यु झाला असून साई मधुकर चव्हाण यांच्या वर उपचार चालू आहे
मयत माजीत रज्जाक शहा (कादरी) हे सावंगी चौक येथे एक छोटी-सी टपरी चालून ते घर संसार चालवायेचे त्यांच्या पच्यात वडील. आई.पत्नी. बहीण एक भाऊ एक मुलगी आसा परीवार आहे त्यांच्या अचानक निधानाने त्यांच्या परीवारावर दुखाचा डोंगर कोसाळला









Comments