नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी.तहसीलदार अविनाश शीगटे
- CT India News
- Apr 1, 2021
- 1 min read
CT INDIA NEWS लासुर स्टेशन प्रतिनिधी.मनीष मुथा नागरिकांनी कोरोना लस घ्यावी .... तहसीलदार अविनाश शिंगटे आज प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर स्टेशन येथे तहसिलदार श्री.अविनाश शिंगटे गटविकास अधिकारी श्री.बेडवाल , पं.स.उपसभापती तथा उपसरपंच श्री.संपत छाजेड यांनी भेट दिली असून कोरोना लसीकरणची सविस्तर माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.शिक्षक , अंगणवाडी सेविका , आशा कार्यकर्ती , याचे सर्वेक्षण चे काम सुरू आहे याची माहिती घेतली.दि .1 एप्रिल पासून वय वर्ष 45 च्या पुढील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे याचे आव्हान केले.या प्रसंगी संजय पांडव , ग्रामसेविका श्रीमती सावंत ग्रा.प.सदस्य अमोल शिरसाठ , प्रकाश कोकरे , नारायण वाकळे , भगवान गाडे , नितीन कांजुणे , मयुर जैस्वाल , संदीप आमराव वैद्यकिय अधिकारी डॉ मंडावरे साहेब श्री औटे साहेब , आरोग्य सेवक श्री.शेळके , श्रीखंडे , कुलकर्णी आदींची उपस्थिती होती .









Comments