नाताळसण जल्लोषात साजरा | लासुर स्टेशन : सेंट जॉर्
- CT India News
- Dec 24, 2021
- 1 min read
लासुर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी मनीष मुथा.
नाताळसण जल्लोषात साजरा | लासुर स्टेशन : सेंट जॉर्ज इंग्लिश हायस्कुल येथे नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला नाताळ सण हा प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म दिवस हा २५ डिसेंबर ला साजरा केला जातो . त्या दिवसाचे औचित्य साधून प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश दिला त्यानिमित्ताने शाळेत कोरोना प्रोटोकॉलच्या नियमांचे पालन करुन सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांनी येशू जन्माची नाटयछटा , कॅरल गायन , विविध नृत्य सादर केले . प्रमुख अतिथी म्हणून रेव्ह फा . आशिष म्हस्के , फा . संजय रुपेकर उपस्थित होते . रेव्ह फा . आशिष म्हस्के यांनी प्रभू विविध मार्गानी आपली कशी काळजी घेत असतो हे गोष्टीच्या माध्यमातून विदयार्थाना पटवून दिले . रेव्ह फा . संजय रुपेकर यांनी जयंतीनिमित्त विदयार्थाना विश्वशांती व प्रेमाचा संदेश सांगितला प्रमुख अतिथींच्या हस्ते विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विदयार्थाचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मॅनेजर रेव्ह फा . संजय पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकवृंद व विदयार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले









Comments