न भूतो न भविष्यती अशी विश्वविक्रम भव्यदिव्य पर्यावरण संवर्धन रॅली चाळीसगांवमध्ये
- CT INDIA NEWS

- Jan 3, 2020
- 2 min read

न भूतो न भविष्यती अशी विश्वविक्रम भव्यदिव्य पर्यावरण संवर्धन रॅली चाळीसगांवमध्ये एक जानेवारीला चाळीसगावात झाला विश्वविक्रम क्राईम करप्शन कंट्रोल असोसिएशन अंतर्गत निती आयोग भारत सरकार व शिक्षण विभाग पंचायत समिती चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने चाळीसगावात दिनांक 1 /1 /2020 रोजी विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली.वर्ल्ड रेकॉर्ड टायटल लार्जेस्ट इन्व्हरमेंट प्रोटेक्शन अवरेनेस रॅली ही रॅली चाळीसगाव मध्ये काढण्यात आली या रॅलीचा दृष्टिकोन प्रत्येक मुलाला एक झाड दिले गेले आणि त्याचे संगोपन तीन वर्ष केले तर त्याला शिष्यवृत्ती देण्यात येईल यासाठी सकाळी आठ वाजेपासून भव्य दिव्य रॅली ही बलराम व्यायाम शाळेच्या ग्राउंड वरून सुरुवात करण्यात आली आणि रॅलीचा शेवट राष्ट्रीय विद्यालय हिरापूर रोड येथे करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण चाळीसगाव मधील तब्बल वीस हजार विद्यार्थी 1200 शिक्षक गावातील दोन हजार नागरिक असा तब्बल २५ हजार लोकांनी पर्यावरण रॅली यामध्ये भाग घेतला तसेच ४०००० विध्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आणि या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा याची शपथ देण्यात आली दिलेले झाडे तीन वर्ष सर्व मुले सांभाळणार आहेत व संभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. शिक्षण विभागाच्या राज्य आयुक्तांनी दखल घेऊन शुभेच्छा पत्र देखील पाठवले तसेच खासदार उन्मेष पाटील यांनी देखील शुभेच्छा पाठवल्या तसेच शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.उपसभापती व सर्व पंचायत समितीच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण विद्यार्थांना झाडे वन विभागाने उपलब्द करून दिले आहेत.यात श्री.दिगंबर पगार उप वन संरक्षक जळगांव श्री.राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगांव तसेच श्री धनंजय पवार वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगांव श्री. ज्ञानेश्वर देसाई वनपरिक्षेत्र अधिकारी पाचोरा. तसेच श्री.राजेश दसरे वनपरिक्षेत्र अधिकारी पारोळा यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच नगरपालिका चाळीसगांव,आरोग्य विभाग, राष्ट्रीय महाविद्यालयाने त्यांचे पटांगण उपलब्द करून दिले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस आर जाधव सर हे उपस्थित होते. मा.श्री.सचिन गोरे अप्पर पोलीस अधीक्षक तसेच श्री.विजय कुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन श्री. प्रताप शिकारे पोलीस निरीक्षक चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा व सर्व पोलीस प्रशासनाचे मोलाचे योगदान लाभले.यात सर्व शाळातील केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीचे मोल काल निश्चित पाहायला मिळाले.सजमाजसेवी संस्था इंनेरवील क्लब ऑफ मिल्कसिटी अश्या अनेक संस्थांचे मार्गदर्शन व योगदान लाभले तसेच क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशन ला तसेच शिक्षण विभाग चाळीसगांव यांना वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी क्राईम करप्शन कंट्रोल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिनेशजी गुप्ता चाळीसगावचे आमदार श्री मंगेश चव्हाण, श्री. प्रदीप दादा देशमुख व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सौ. स्मितालताई बोरसे सभापती पंचायत समिती चाळीसगांव गटशिक्षणाधिकारी श्री विलास भोई क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अश्विन खैरनार तसेच औरंगाबादचे क्राईम अँड करप्शन कंट्रोलचे औरंगाबादचे श्री.गणेश चौधरी प्रा.चंद्रकांत ठोंबरे श्री.किसनराव जोर्वेकर सचिन ठोंबरे महेंद्र सूर्यवंशी शैलेश सोनवणे सिद्धार्थ निकम यशवंत चित्ते ललित चित्ते विनोद पवार संतोष महाले उमेश आव्हाळे सौ प्रतिभाताई चव्हाण रोहित मोरे वैभव बाबर सचिन वाघ तसेच सर्व नगरसेवक व सर्व पत्रकार बांधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.








Comments