निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे...*_ _आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरभर चर्चेच
- CT India News
- Jan 30, 2022
- 1 min read
प्रतिनिधी- गणेश चौधरी 8329897617
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे...*_
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरत आहे हे बॅनर._
मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. यासाठी जातीची कोणतीही अट नाही. वय वर्ष २५ ते ४० अविवाहीत, विधवा, घटस्फोटित चालेल. फक्त २ पेक्षा जास्त अपत्ये असणारी चालणार नाही," असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. या बॅनरवर त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक देखील टाकला आहे.
माझी राजकारण यायची इच्छा होती. परंतु मला तीन अपत्ये असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. मी फार जुना कार्यकर्ता आहे, त्यामुळे नगरसेवक पदाची निवडणूक तरी लढवावी असं मला वाटलं. आता मी तर निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी विचार केला की लग्न करायचं, बायकोला निवडणुकीत उभं करायचं आणि निवडून आणायचं," असे रमेश विनायकराव पाटील यांनी सांगितले.









Comments