नवीन वर्षानिमित्ताने नर्सरीला दिली भेट
- CT India News
- Jan 2, 2021
- 1 min read
रिपोर्टर :- सुरेश सुतार
अग्राण धुळगाव कवठेमहांकाळ
9665635435
हेडिंग :- नवीन वर्षानिमित्ताने नर्सरीला दिली भेट
कमी कालावधीत वृक्ष कसे वाढवायचे याची माहिती घेण्यासाठी व अग्रणी पाणी फाउंडेशन 2021 वृक्षारोपण संगोपनासाठी हरीतमय अग्रण धुळगाव संकल्पनेसाठी कोणत्या माध्यमातून कशा स्वरूपात पुढे जायचे याचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी काल बाबानगर येथील नर्सरीला माझा फौजी मित्र मनोहर नेताजी देसाई यांच्यासोबत भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली.
या नर्सरी मधून आलेले अनुभव मिळालेली परिपूर्ण माहिती भविष्यातील आपल्या वाटचाली साठी नक्कीच फायदा होईल. या दरीमध्ये उपलब्ध असणारे 10 ते 15 फूट उंचीचे वृक्ष लावले तर वृक्ष मोठे असल्यामुळे लवकर मुळी पकडतात व मोठे होतात यामुळे साधारण एक वर्ष आपण हे वृक्ष संगोपन केले तर वृक्ष फक्त पावसाच्या पाण्यावर जगू शकतील एवढे मोठे होतात त्यामुळे आपला त्रास कमी होईल व हरित मय अग्रण धुळगाव वाटचालीसाठी आपणास मदत होईल. फक्त आपल्याला हे वृक्ष सुरुवातीला मोठे आणत असल्यामुळे मोठेवृक्ष आनताना खर्च जास्त होईल पण आपल्याला एवढे मोठे कष्ट करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा खूप कमी पैसे मोजावे लागतात व त्रास होणार नाही. मोठे वृक्ष असल्यामुळे जनावरांनी खाण्याची भीती नाही. जाळीचा खर्च नाही. या नर्सरीमध्ये वड पिंपळ लिंब करंज कांचन बहावा गुळभेंडी यासारखे शेकडो प्रकारचे 60 ते 70 हजार वृक्ष पाहायला मिळाले. हे नर्सरी पाहून आनंद झाला. या आनंदातून वृक्षारोपण करून स्वच्छ निर्मळ प्रसन्न वातावरणात वर्षभर व आयुष्यभर आनंदित राहू
श्री अनिल लोहार सर
CT INDIA NEWS सांगली जिल्हा व बेळगाव जिल्हा प्रमुख
8999382747









Comments