top of page

पंटर मार्फत सव्वा लाखाची लाच स्वीकारतांना जळगाव प्रांताधिकारी दिपमाला चौरे सह लिपीक याना अटक

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 22, 2020
  • 1 min read

ree

प्रतिनिधी - श्रीकृष्ण चौधरी सर (जळगाव)

पंटर मार्फत सव्वा लाखाची लाच स्वीकारतांना जळगाव प्रांताधिकारी दिपमाला चौरे सह लिपीक अतुल सानप लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापड्यात अडकले .



जळगाव प्रांताधिकारी दिपमाला चौरे सह अतुल सानप यांनी सव्वा लाख रुपायांची लाच घेतांना ए .सी . बी पथकाने सापडा रचुन पकडल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे .

या बाबत सविस्तर असे की तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन त्यांच्याकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचेकडील परवाना असतांना सदर वाळु वाहतुक करणाऱ्या दोन ट्रक जळगावच्या तहसिल पथकाने एमआयडीसी परीसरात पकडून सदर ट्रक एमआयडीसी पोलीस स्टेशनला उभे केलेत, सदर ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात आरोपी क्रं.1 यांच्यावतीने त्यांच्या समक्ष आरोपी क्रं.2 यांनी दि.20/08/2020 रोजी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 2,00,000/-रूपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1,25,000/-रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.2 यांच्या खाजगी पंटरने स्वीकारली. सदर कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव परीसरात करण्यात आली. 

श्रीमती दिपमाला जयपाल चौरे, वय-36, उपविभागीय अधिकारी जळगाव भाग, रा- सागरपार्क समोर, रामेश्वर शासकीय निवासस्थान, जळगाव,ता.जि.जळगाव. वर्ग -१.

*२)* अतुल अरुण सानप, वय-32, लिपीक, उपविभागीय अधिकारी कार्यालय,जळगाव भाग, रा-महाजन नगर, दत्त मंदीराजवळ,मेहरुण,जळगाव.ता.जि.जळगाव. वर्ग-३.

▶️ *लाचेची मागणी-* 2,00,000/-₹ तडजोडीअंती 1,25,000/-₹

▶️ *लाच स्विकारली-* 1,25,000/₹

▶️ *हस्तगत रक्कम-* 1,25,000/-रु

▶️ *लाचेची मागणी -* ता.20/08/2020 

▶️ *लाच स्विकारली -* ता. 21/08/2020

▶️ *लाचेचे कारण -*.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶ *सापळा पथक-* PI. संजोग बच्छाव, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोना.मनोज जोशी,पोना.सुनिल शिरसाठ, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर. 

▶️ *तपास अधिकारी-*

संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.जळगांव.

▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*३)* मा.जी.एम.ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि.जळगांव.

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा.जिल्हाधिकारी सो, जिल्हाधिकारी कार्या.जळगाव. 

पुढील तपास अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. करीत आहे

Comments


bottom of page