पेड तालुका तासगाव या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया गट कडून आंदोलन
- CT INDIA NEWS

- Sep 28, 2020
- 1 min read

प्रतिनिधी- तुकाराम सुतार-
पेड तालुका तासगाव या ठिकाणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीनेमहाराष्ट्रातील कलावंतांना शासनाने प्रत्येक कलावंताला महिना १०,००० रुपये मानधन द्यावे. राज्यातील तमासगीर, शाहीर, वाघ्या मुरळी, व अन्य कलावंतांना या कोरोना काळात त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची उपासमार होत असून त्या सर्व कलावंत शिबिरांचे कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करण्यास शासनाने परवानगी ध्यावी. पेड तालुका तासगाव या गावचे नामवंत शाहीर ज्यांनी देशात पहिल्यांदा तमाशा उभा केला ते शाहीर बाबाजी उमाजी साठे मांग यांचे भव्य असे स्मारक पेड या गावी व्हावे. या मागणीसाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले. शासनाने लवकरात लवकर या मागण्या पूर्ण न केल्यास. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विधानभवनवर वाद्य, वाजंत्रयासहित सर्व कलावंतांना घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संदिप ठोंबरे राज्यसरचिटणीस, सतिश लोंढे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, भास्कर सदाकळे, महाराष्ट्र कलावंत संघ डि पी आय, सतिश भंडारे डि पी आय नेते ,गॅब्रिएल तिवडे सांगली जिल्हाध्यक्ष, आयुष पटेल राजाध्यक्ष, शीतल खरात महिला जिल्हाध्यक्षा. शेखर मोहीते पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, यांनी केले







Comments