top of page

पुणे येथून औरंगाबाद येथे आलेल्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय युवकाने घेतला गळफास

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jun 15, 2020
  • 1 min read


ree

औरंगाबाद प्रतिनिधी -गणेश चौधरी--- लॉकडाऊनमुळे पुणे येथून औरंगाबादेत घरी आलेल्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थाने घरातील हॉल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलीकनगर मधील गजानन कॉलोनी भागात घडली. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही पोलीस पुढील तपास करीत आहेत. विवेक भाऊलाल पांणकडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विवेक हा पुणे येथे कला शाखेत प्रथम वर्षांचा शिक्षण घेत होता.लॉकडाऊनमुळे ते सुमारे तीन आठवड्यापूर्वी घरी आला होता.शुक्रवारी संध्याकाळी आई बेडरूममध्ये साफसफाई करीत होती. त्यावेळी विवेक ने घरातील हॉलचे दरवाजे आतून बंद करून घेतले.तो अभ्यास करीत असावा किंवा टीव्ही बघत असावा असे वाटल्याने आई कामात गुंतली मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील विवेक दरवाजा उघडत नसल्याने आईने त्यास हाक दिली मात्र हॉल मधून काही एक प्रत्युत्तर येत नसल्याने आई घाबरली शेजारीच्या मदतीने दरवाजा उघडला असता विवेक ने छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची समोर आले.

Comments


bottom of page