पुणे शहर प्रतिनिधी :-डॉ प्रितेश पाटील *भारतातील पहिला नागरिक ज्यांनी २०१४ साली माऊंट एव्हरेस्ट च
- CT India News
- Sep 6, 2021
- 2 min read
पुणे शहर प्रतिनिधी :-डॉ प्रितेश पाटील *भारतातील पहिला नागरिक ज्यांनी २०१४ साली माऊंट एव्हरेस्ट चीनच्या ( तिबेट ) ( Northen )बाजूने सर केले व २०१७ साली तेच माऊंट एव्हरेस्ट* *नेपाळच्या (Southen ) बाजूने सर केले . ज्यांनी Mount Kilimanjaro टांझानिया ( आफ्रिका* *१९३४१ फूट उंच ) , Mount Elbrus ( रशिया १८५१० फूट ) , उत्तराखंड* *येतील माऊंट कामेत ( २५४४६ फूट उंच ) ह्या उत्तुंग मोहीमा सर केल्या , ते सायकलिंग च्या बाबतीतही पुढे आहेत.* *त्यांनी पुणे - गोवा हे ६४२ किमी अंतर ३० तासात पूर्ण केले. तसेच अनेक वेळा World मॅरेथॉन , मुंबई , दिल्ली ,* *पुणे गोवा रिव्हर* *मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन पहिल्या ५ मध्ये आले आहेत. अशी अद्वितीय कामगिरी करणारे पुण्याचे तसेच ज्यांचा पूर्ण* *भारताला अभिमान वाटावा असे भुसारी कॉलनी कोथरूड , पुणे* *येथील श्री किशोरजी धनकुडे . ते स्वतः सिव्हिल इंजिनियर व बांधकाम व्यावसायिक आहेत . ५* *सप्टेंबर २०२१ शिक्षक दिनाच्या निमित्ताने किशोरजींनी पहिला हिमालय ट्रेक घडवणारे " दीपक काठाळे* *सर" याना अभिवादन केले. किशोरजींनी म्हातोबा ट्रेकिंग ग्रुप या हौशी ट्रेकर ग्रुपला प्रोजेक्टर च्या* *साहाय्याने* *हिमालयातील त्याच्या प्रचंड यशस्वी expedition चा ( मेहिमांचा ) प्रवास कसा होता , त्याबद्दल सुंदर माहिती* *दिली . या संदर्भात आमच्या सर्व प्रश्नांची त्यांनी मोकळॆपणाने सविस्तर माहिती दिली. एवढी सफलता मिळवून किशोरजी अत्यंत मनमोकळे व नम्र* *आहेत . ही एका अस्सल गिर्यारोहकाची खासियत असते . त्यांचा गिर्यारोहणाचा अचूक अभ्यास व प्रचंड* *अनुभव बघून आम्ही थकक* *झालो . म्हातोबा ट्रेकिंग* *ग्रुप चे सर्व सदस्यांनी या कार्य्रक्रमाचा मनापासून आस्वाद घेतला . अरविद कदम सर व काठाळे सर यांनी या* *कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले होते .* *राहुल भानोसे यांनी लॅपटॉप ,* *प्रोजेक्टर व याकार्यक्रमासाठी* *हॉल मिळवून दिला .श्री अरविंद कदम व दीपक काठाळे सर यांनी हा कार्यक्रम घडवून* *आणला . या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री अरविंद कदम यांनी केली. किशोर जिंचा सत्कार श्री राहुल भानोसे यांचे हस्ते* *करण्यात आला. श्री दीपकजी* *काठाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार* *मानून कार्यक्रम संपन्न झाला.*🎤🎤CT INDIA NEWS 🎤🎤पुणे प्रतिनिधी :-प्रितेश पाटील 9823100589







Comments