top of page

पुणे शहर भाजपा च्या वतीने आज मांजरी येथे दूध दरा साठी जोरदार आंदोलन करण्यात आले

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 4, 2020
  • 2 min read


प्रतिनिधी -सचिन चौधरी पुणे-

उद्धवसाहेब खवा खा, पण दुधाला दर द्या..

मंत्र्यांसाठी 20 लाखाच्या गाड्या घ्या, पण शेतकर्याच्या दुधाला दर द्या..


पुणे शहर भाजपच्या वतीने आज मांजरी येथे दूध दरासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. राज्यातला दूध उत्पादक शेतकरी गेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊनमुळं प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. या संदर्भात सातत्यानं आवाज उठवून देखील राज्य सरकार दूध उत्पादकांच्या प्रश्नांकडं लक्ष देण्यास तयार नाही.


एकीकडे मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांसाठी आणि सरकारी अधिकार्यांसाठी प्रत्येकी वीस लाख रुपयांच्या अलिशान गाडी खरेदीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात; पण अडचणीत सापडलेल्या शेतकर्याला दुधाचा दर देताना मात्र त्यांच्या हातून पैसा सुटत नाही. ठाकरे सरकारचं प्राधान्य मंत्र्यांच्या अलिशान गाड्यांना, मंत्र्यांच्या ऐषो आरामाला आहे की, या शेतकर्यांना मदत करण्यास आहे, हेच समजेनासे झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारकडे निधी नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री, दुग्ध विकासमंत्री स्वत:ला 'शेतकर्याची मुलं' म्हणवून घेतात मात्र निर्णय घ्यायची वेळ आली की त्यांना याचा सोईस्कर विसर पडतो.


म्हणूनच या निष्क्रीय सरकारला जागं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आज राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन केले.


आम्हीही पुणे शहर भाजपा शाखेच्यावतीने पुणे जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला.


वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने शहर भाजपचा अध्यक्ष या नात्याने मांजरी येथील आंदोलनाचे नेतृत्व मी केले. मी स्वत:देखील शेतकरी आहे. दूध उत्पादक आहे.त्यामुळं दूध उत्पादकांच्या प्रश्नांकडे मुक्या-बहिर्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी कधीच दुधाची नासाडी करु शकत नाही. कारण दुधाच्या प्रत्येक थेंबासाठी शेतकऱ्याला कराव्या लागणाऱ्या श्रमाची जाणीव आम्हाला आहे.


म्हणून मी लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पुणे शहरच्यावतीने शेतकऱ्यांनी दिलेल्या दुधाचा खवा तयार करून तो राज्याच्या मुख्यमंत्री, आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे पाठवण्यास सांगितले आहे. हेतू का शेतकऱ्यांच्या श्रमातून उत्पादीत झालेल्या दुधाच्या खव्याची गोडी चाखल्यानंतर तरी या सरकारला शेतकऱ्यांच्या घामाचं दाम देण्याची बुद्धी व्हावी.


लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या दूध उत्पादक शेतकर्यांना प्रति लिटर १० रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे, दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, गायीच्या दूधाला प्रति लिटर ३० रुपये दर द्यावा या प्रमुख मागण्या आज आम्ही सरकारकडे मांडल्या आहेत.


पुणे शहर भाजप कार्यकर्त्यांनी मांजरीप्रमाणेच, नसरापूर, बावधन, उरळी मंतरवाडी फाटा, वाघोली, कोंढणपूर, कात्रज येथेही आंदोलन केले. मला अपेक्षा आहे, की सरकार यातून योग्य तो बोध घेईल आणि दूध उत्पादकांना रास्त भाव देईल.


यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, रोहिदास सेठ उंद्रे,स्वप्नील उंद्रे,संतोष खांदवे, संदीप जऱ्हाड, मनीषा उंद्रे,संतोष राजगुरू, बेबीताई उंद्रे,अर्जुन जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, विकास उंद्रे,आशा जगताप, रावसाहेब राखपसरे, सुधीर गलांडे,अरविंद गोरे, शांताराम उंद्रे,धनंजय जाधव, भानुदास भोसले,सुशीला पवार, राजू साखरे, संदीप मोझे,दत्ताभाऊ मस्के, राजेंद्र पठारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


bottom of page