top of page

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील २१ महत्त्वाचे मुद्दे

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 15, 2019
  • 2 min read

ree

१)देशातील अनेक भागात पूरग्रस्तस्थिती आहे, मी त्यांचं सांत्वन करतो, राज्य सरकारांनी जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत. २)देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान, योगदान देणाऱ्या सर्वांना नमन करतो ३)कलम 370 आणि कलम 35 अ हटणं हे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे ४)फक्त 10 दिवसात सरकारने देशहिताची पावलं उचलली ५)जर 2014 ते 2019 हा गरजांचा पूर्तता करण्याचा काळ होता, तर 2019 नंतरचा काळ हा देशवासियांच्या आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्याचा कालखंड आहे ६)'सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन आम्ही चाललो होतो, पण 5 वर्षातच देशवासियांनी ‘सबका विश्वास’च्या रंगाने संपूर्ण वातावरण रंगवलं ७)आम्ही अडचणी टाळत नाही किंवा कुरवाळत बसत नाही, अशी या सरकारची ओळख आहे. जे काम मागील 70 वर्षात झालं नाही ते 70 दिवसात झालं ८)आज देश अभिमानाने सांगू शकतो की, ‘वन नेशन, वन कॉन्स्टिट्यूशन’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९)भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन : “कलम 370 हटवल्यानंतर आज भारत गर्वाने म्हणू शकतो, वन नेशन वन कॉन्स्टिट्युशन” १०)येत्या काळात ‘जल जीवन मिशन’ सुरु करुन प्रत्येक घरात पिण्याच्या पाणी देण्याचा प्रयत्न, साडेतीन लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम या मिशनसाठी तरतूद केली जाईल. ११)भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन : केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित काम करुन साडेतीन लाख करोडपेक्षा जास्त रक्कम जलजीवन मिशनसाठी वापरणार १२)वाढती लोकसंख्या हे देशासमोरचं मोठं आव्हान आहे, छोटं कुटुंब म्हणजे देशभक्तीचं कार्य, छोट्या कुटुंबामुळे विकासाला चालना मिळते १३)भारताच्या वाढत्या लोकसंख्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बोट, वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठं आव्हान १४)सरकारने हळूहळू लोकांच्या आयुष्यातून बाहेर पडावं, साथीदार म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे, जेणेकरुन ते स्वातंत्र्याने जगू शकतील. सरकारचा दबाव नसावा, किंवा सरकारचा अभाव नसावा १५)मी दरदिवशी एक कायदा रद्द केला, 1450 कायदे रद्द केले आहेत, ही स्वतंत्र भारताची आवश्यकता होती १६)देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे, जगात आपलं स्थान प्रस्थापित करायचं आहे, पहिल्यांदा लोक विचारायचे पक्के रस्ते कधी होणार, आता 4-8 पदरी हायवे कधी बनणार, असं विचारतात १७)‘एक देश, एक संविधान’नंतर आता ‘एक देश, एक निवडणूक’वर विचार करण्याची वेळ १८)काही देश केवळ भारतालाच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना दहशतवादाने उद्ध्वस्त करत आहे. बांगलादेश आणि श्रीलंकाही दहशतवादाचा सामना करत आहेत १९)तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद नव्याने निर्माण करणार २०)प्लास्टिकमुक्तीसाठी अभियान सुरु करणं गरजेचं, दुकानांमध्ये प्लास्टिक पिशवी न मागण्याचं बोर्ड लावावा २१)तुम्ही लक्ष्य ठेवा की, 2022 पर्यंत देशातील कमीत कमी 15 पर्यटन स्थळांना भेट देऊन भारतीय संस्कृतीच विविधता पाहा

Comments


bottom of page