top of page

पूरग्रस्तांच्या मदतीतही सरकारची जाहिरातबाजी

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 11, 2019
  • 1 min read

ree

गुरूवारी पूरग्रस्तांना मदतीसाठी जाताना शेअर केलेल्या सेल्फी व्हिडीओनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर भाजपा आमदाराचा असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली असून त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अशातच भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी या अन्नधान्यांच्या पॅकेट्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपल्या फोटोचे स्टीकर्स लावले आहे. त्यानंतर पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीतही भाजपा सरकार जाहिरातबाजी करत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटू लागल्या आहेत.कोल्हापूर आणि सांगलीती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने मदत पुरवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी या अन्नधान्यांच्या पॅकेट्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपला फोटोचे स्टीकर्स लावल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच स्थानिक पुढारी समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांचीदेखील यावर नावे टाकण्यात आली आहेत.

Comments


bottom of page