पुरग्रस्तांना तेली सेनेच्या वतीने खाद्य तेलाची मदत
- CT INDIA NEWS

- Aug 17, 2019
- 1 min read

औरंगाबाद:- प्रतिनिधी, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना करण्यात येणाऱ्या मदतीत आपलाही सहभाग असावा अशी इच्छा सर्वांची झाली होती त्याच अनुषंगाने काय मदत करता येईल याचे विचार मंथन सुरू झाले होते.कोणते साहित्य दिर्घकाळ टिकु शकेल.दिर्घकाळ टिकणारी वस्तु म्हणजे खाद्य तेल तेल हे व रोज लागणारे साहित्य व दिर्घकाळ टिकणारे आहे.याचा विचार करून तेली सेनेने फुल ना फुलाची पाकळी म्हणुन पुरग्रस्तांना खाद्य तेलाचे डब्बे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी समाज बांधवांना आवाहन केले होते की तेलांच्या डब्बांया करीता आपल्या यथा शक्ती नुसार मदत करावी व अनेक समाज बांधवांनी पुढे येऊन प्रतिसाद देत पाच पाचसे रुपायांची मदत केली होती.महेंद्र महाकाळ.अशोक चौधरी,कैलास सिदलंबे,ऊर्जित करवंदे सर, भगवान मिटकर,कल्याण अन्नपुर्ण , गणेश पवार,सुनिल क्षीरसागर,अनिल क्षीरसागर.योगेश थोरात,सुनिल पाखरे,राजेंद्र रोठे,संतोष सुरुळे,रविंद्र म्हसके.नितीन तावडे,मुकेश सुरडकर.विशाल नांदरकर.सौ.नम्रता कुंरजेकर.आदींनी मदत करून माणुसकीचा धर्म पाळला.पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जनतेने गतीने पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.तेली सेना,तेली समाज एवढ्यावरच ना थांबता पुरग्रस्तांनाच्या पाल्यां करीता आगामी काळात जिल्हा भरात फिरून दहा हजार व्ह्यांचे संकलन करण्याचा मानस आहे.महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय नामदार अतुल सावे साहेब व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकरणी सदस्य अनिलभैय्या मकरीये यांचे मोठे सहकार्य लाभणार आहे.असे तेली सेनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल क्षीरसागर यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.तेली सेना ही जरी जातीच्या नावाने असली तरी या तेली सेनेच्या माध्यमातून सर्व समावेशक भूमिकेतून कार्य केले जाते.राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय जयदत्त क्षीरसागर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची सामाजीक वाटचाल सुरू आहे.असे सुनिल क्षीरसागर म्हणाले.या प्रसंगी कूष्णा ठोंबरे,अशोक चौधरी, कचरदास राऊत ,(मामा) सुभाष वाळके,संतोष वाळके, सचिन वाळके,योगेशभाऊ थोरात, सुनिल क्षीरसागर,अनिल क्षीरसागर,नितीन तावडे,विनोद मिसाळ,विठ्ठल एडके,गणेश चौधरी, गणेश पवार,आदींची उपस्थिती होती.







Comments