top of page

प्रतिनिधी : कृष्णात मोरे,जावली सातारा हेडींग : पल्लवी पाटील यांनी केली गणेश विसर्जनासाठी बांधण्यात

  • Writer: CT India News
    CT India News
  • Sep 12, 2021
  • 2 min read

प्रतिनिधी : कृष्णात मोरे,जावली सातारा


हेडींग : पल्लवी पाटील यांनी केली गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आलेल्या हौदाची पाहणी.

महाबळेश्वर शहरातील गणेश भक्तांच्या सोईसाठी पालिकेच्या वतीने नळावरील विहिरी शेजारी गणेश विसर्जन हौद बांधला आहे त्या ठिकाणी केलेल्या व्यवस्थेची पाहणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली या वेळी पालिकेचे अधिकारी व पत्रकार हे देखिल उपस्थित होते

महाबळेश्वर शहरात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळे हे पाच दिवसांचे गणपती बसवितात त्या मुळे शहरातील गणेश मुर्तींचे विसर्जन 95 टक्के हे पाचव्या दिवशीच होते दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशी दिवशी काही मोजकीच मंडळे विसर्जन करतात काही वर्षांपुर्वी नळा वरील विहीरीत विसर्जन केले जात होते पंरतु ती विहीर गाळाने भरत होती शिवाय दरवर्षी विहीर साफ करावी लागत होती शिवाय विहीरीतील पाण्याचे नैसर्गिक झरे हे कमी होवु लागले होते शिवाय विहीरीत गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरण प्रेमी आक्षेप घेत होते म्हणुन तत्कालिन नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनी आठ वर्षांपुर्वी सार्वजनिक विसर्जन विहीरी शेजारी एक मोठा कृ.ित्रम हौद तयार केला व तेव्हा पासुन या कृत्रिम हौदातच गणेश मुर्तींचे विसर्जन केले जाते विहीरीत कोणी विसर्जन करू नये या साठी ती विहीर बंद करण्यात आली आहे पालिकेने केलेल्या या सर्व व्यवस्थेची पाहणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नुकतीच केली हौदा मध्ये पुर्ण पाणी भरा अशा सुचना त्यांनी केल्या विसर्जन तळावर येणारी वाहने पाहता त्या तळावरील सर्व खड्डे हे बुजविण्यात आले आहे कृत्रिम हौदा शेजारी निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सुचना या वेळी मुख्याधिकारी यांनी कर्मचारी यांना केल्या

कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी मागिल वर्षा पासुन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहरात 14 ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था केली होती यंदाही अशीच व्यवस्था केली जाणार आहे मागील वर्षी ज्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही अशा दोन ठिकाणा वरील कुंड रद्द् करून यंदा शहरात बारा ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था केली जाणार आहे नागरीकांची एकाच ठिकाणी विसर्जनासाठी गर्दी होवु नये या साठी ही व्यवस्था करण्यात येत आहे नागरीकांनी देखिल आपल्या घराजवळ असलेल्या पालिकेच्या कृत्रिम कुंडात आपल्या गणेश मुर्तींचे विसर्जन करून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे या पाहणी वेळी त्यांचे सोबत पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे अजित जाधव व विलास काळे हे उपस्थित होते

CT INDIA NEWS कार्यकारी संपादक श्री तुकाराम सुतार

9604007344

Comments


bottom of page