top of page

प्रतिभा बोडखे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 6, 2019
  • 1 min read

सोयगाव, प्रतिनिधी संदीप इंगळे - काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश होवून २४ तास उलटत नाही तोच स्थानिक भाजपचं नेत्यांनी राजकीय खेळी करून नाराज शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना हाताशी धरून सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्या विरुद्धचा दाखल केलेला अविश्वास ठराव १३ विरुद्ध शून्य मतांनी पारित करून आमदार अब्दुल सत्तार यांना पहिलाच चकवा दिल्याने सोयगावात राजकीय समीकरणे बदलली आहे. सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेना-भाजप युतीच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्या विरुद्ध पंधरा दिवसापूर्वी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर मंगळवारी सभागृहात पीठासन अधिकारी उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी सभागृहात तेरा नगरसेवक उपस्थित होते.या सर्वच नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले.यामध्ये शिवसेनेची तीन मते फुटल्याने भाजपच्या बाजूने पुरेपूर संख्याबळ मिळाल्याने तेरा विरुद्ध शून्य असा ठराव पारित करण्यात आला होता.दरम्यान शिवसेना-आणि काँग्रेस यांची प्रत्येकी दोन सदस्य गैरहजर राहिली होती. दरम्यान यावेळी भाजपाचं जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे, पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, शहराध्यक्ष सुनील ठोंबरे, वसंत बनकर, शांताराम देसाई, मधुकर पाटील, दीपक पाटील, मंगेश सोहनी, रवींद्र पाटील, बापू काळे, नाना घुले, भरत काळे, राजेंद्र जावळे, अनिल चौधरी, जितेंद्र झंवर, कादिर शहा, सुरेश मनगटे आदींनी जल्लोष केला. सभागृहात उपस्थित सदस्य भागवत गायकवाड, लतीफ शहा, वर्षा मोरे, वंदना बनकर,योगेश मानकर, कैलास काळे, मनीषा चौधरी, युवराज आगे, अनिता तडवी, योगेश पाटील, सुलताना देशमुख, सिकंदर तडवी, शोभा मोरे,या सदस्यांची सभागृहात उपस्थिती होती संदीप इंगळे

Comments


bottom of page