top of page

प्रधानमंत्री आवास घरकुल योजना खटाव तालुक्‍यात प्रभावीपणे राबवणार. गटविकास अधिकारी रमेश काळे .

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 9, 2021
  • 1 min read

प्रधानमंत्री आवास घरकुल योजना खटाव तालुक्‍यात प्रभावीपणे राबवणार.

गटविकास अधिकारी रमेश काळे .


तडवळे प्रतिनिधी - श्री जे के काळे

तडवळे तालुका खटाव

तडवळे ता. खटाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेचा शासकीय गृहप्रवेश यानिमित्ताने तडवळे तालुका खटाव येथे गटविकासअधिकारी श्री रमेश काळे सो बोलत होते. यावेळी सरपंच गणपत खाडे व ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील तसेच गृहनिर्माण अधिकारी पोवरा साहेब अजित जगदाळे व ग्रामसेवक सचिन सस्ते व लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी श्री काळे म्हणाले की, सर्वांना घरे ही शासनाची योजना पात्र लाभार्थी पर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच तसेच ग्रामसेवक यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून ही योजना तळागाळातील सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहचवावी. यावेळी त्यांनी कमी कालावधीत घरकुल पूर्ण केले त्याबद्दल लाभार्थी सरपंच तसेच ग्रामसेवक यांना धन्यवाद दिले सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची कामे त्वरित पूर्ण करावीत .त्यासाठी लाभार्थ्यांना वेळेत हप्ते मिळतील त्याचप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या घरापुढे परसबाग म्हणून पाच झाडे लावून परिसर सुशोभित करण्यात साठी सर्व नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले .

यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी एकमेकीला हळदी कुंकू लावून महिला दिन साजरा करण्यात आला.

Comments


bottom of page