प्रभाग क्र 8 मधील लोकांना पाणी द्या अन्यथा नगरपरिषद समोर आंदोलन करू : सुनील बागडे
- CT India News
- Nov 24, 2020
- 1 min read
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क. विजय तिकोटी
(जत तालुका हेड ) 9834181802
प्रभाग क्र 8 मधील लोकांना गेली 15 ते 20 वर्ष होऊन देखील पाणी मिळत नाही त्यासंदर्भात प्रहार चे तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांच्या कडे तेथील नागरिकांचे तक्रार येताच लगेच सुनील बागडे व प्रहार चे इतर पदाधिकारी यांनी प्रभाग क्र 8 मधील लोकांचे प्रतिक्रिया ऐकून घेत ज्या घराला आज पर्यंत पाणी मिळालं नाही त्या प्रत्येक घरी जाऊन त्या लोकांच्या भेटी घेत नाव व सही घेऊन
जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदन व 40ते 45 लोकांचे घराचे सही घेतलेले प्रत जोडून निवेदन देण्यात आले व प्रहार चे तालुका अध्यक्ष सुनील बागडे या वेळी म्हणाले की लवकरात लवकर साळे वस्ती कृषि कॉलनी व अंबिका नगर येथील लोकांना पाण्याची व्यवस्था करून नाही मिळालं की जत नगरपरिषद समोर पाण्याची भांडी घेऊन आंदोलन करण्यात येईल यावेळी उपस्थित प्रहार जत शहर अध्यक्ष सचिन जाधव, रुगणसेवाक जत शहर अध्यक्ष शिवानंद गुरव व रोहित जाधव उपस्थित होते









Comments