top of page

*प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून अभिनंदन* मुंबई, दि

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 1, 2022
  • 1 min read

*प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून अभिनंदन*


मुंबई, दि. १- मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसी कृत्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगून शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


वैयक्तिक कारणास्तव रूपा मोरे या सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी अचानक खाडी उडी मारण्याचा प्रयत्न केला. याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्र्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी श्री.डुबल आणि श्री.मिरगळ यांना अनपेक्षितपणे घडणारी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ सदर महिलेस उडी मारण्यापासून प्रवृत्त करत रोखल्याने अनर्थ टळला. त्यांच्या या प्रसंगावधानाचे मंत्रालयात कौतुक होत आहे.

Comments


bottom of page