पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थ्यांना करिअ
- CT India News
- Feb 12, 2022
- 1 min read
CT INDIA NEWS लासुर स्टेशन प्रतिनिधी मनीष मुथा
*शिल्लेगाव पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन*
दिनांक 10 फेब्रुवारी 2022
सेंट जॉर्ज इंग्लिश हायस्कूल तर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिल्लेगाव पोलीस स्टेशन मार्फत क्षेत्रीय भेट उपक्रमांतर्गत करियर विषयक मार्गदर्शन देण्यात आले. वाढत्या गुन्हेगारी पासून संरक्षण व पोलीस विभागातील करिअर संधी याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व उत्सुकता निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने ही क्षेत्रीय भेट आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीस विस्तृतपणे पोलीस ठाण्यातील कामकाजाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तक्रार कशी दाखल करावी, शस्त्रागार गृह , बंदीगृह व वेगवेगळ्या विभागाची सविस्तरपणे विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. तद्नंतर पोलीस निरीक्षक खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना हसत-खेळत पोलीस विभागातील करिअर संधी, वेगवेगळी पदे व त्यासाठी लागणारी पात्रता याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रकट केलेल्या शंका व प्रश्नांचे त्यांनी निरसन केले. प्रसारमाध्यमांत अति व्यस्तता व गुन्हेगारी प्रवृत्ती पासून दूर राहून आपले ध्येय निवडावे असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस क्षेत्राबद्दल आदरभाव निर्माण झाला व बऱ्याच विद्यार्थ्यांनी हेच करिअर निवडण्यासाठी पसंती दर्शवली. पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थ्यांना नाष्टापाण्याची व्यवस्था करण्यात आली. शेवटी प्रशांत साबळे ह्या विद्यार्थ्याने शाळेच्यावतीने सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. याप्रसंगी शाळेचे मॅनेजर फा.संजय पारखे, विजय बोरखडे सर, पाटील सर व सिस्टर सविता यांची उपस्थिती होती











Comments