*पुस्तके भेट देऊन सम्राट अशोक जयंती साजरी* कारंजा (घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर . कारंजा( घा ):-स
- CT India News
- Mar 8, 2022
- 1 min read
*पुस्तके भेट देऊन सम्राट अशोक जयंती साजरी*
कारंजा (घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर .
कारंजा( घा ):-संभाजी ब्रिगेड कारंजा शहर कमिटीच्या वतीने चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त 15 मुलांना प्रबोधनपर पुस्तके भेट देण्यात आली .शब्दकोष ,शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचा यात समावेश आहे .संभाजी ब्रिगेड चे युवानेते पियुष रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला ."महापुरुषांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी "हा संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या द्वारे प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाअंतर्गत आज कारंजा शहरातील अभ्यासू मुलांना सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप करण्यात आले .यावेळी संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर ,हर्ष पाठे ,दक्ष जाधव ,वैभव नारिंगे आदी संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
Comments