top of page

पं.स.सदस्य पूजा मोरे यांची गेवराईच्या वयोवृद्ध मदत

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jun 29, 2020
  • 1 min read



औरंगाबाद,दि.26 (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील गेवराईच्या एस.टी.स्टॅंडवर गेल्या 35 वर्षा पासून भल्या पहाटे वृत्तपत्र वाटप करणारे कृष्णा सरोदे ( तात्या ) हे गेल्या तीन महिन्यापासून आजारी असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.त्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते.औरंगाबाद येथील पत्रकार तथा समाजसेवक गणेश पवार यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून ही वार्ता कळाली.आपल्यालाही काही मदत करता येऊ शकते का?या विचारातून त्यांनी गेवराई सर्कलच्या पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी संघटना युवती अध्यक्षा पूजा अशोक मोरे यांना योग्य ती मदत करण्याची विनंती केली.त्यांनीही माणुसकीच्या दृष्टिकोनातून जीवनावश्यक साहित्य देऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.

कृष्णा सरोदे (वय 69 वर्ष) यांनी 1984 साला पासून गेवराई येथे येणारे वृत्तपत्र वाटपास सुरूवात केली.शहरातील विविध भागात खंड न पडता गेल्या 35 वर्षा पासून वृत्तपत्र ते वाटप करायचे . मात्र तीन महिन्यापूर्वी वर्तमानपत्राचे वाटप करत असताना भगवती चित्र मंदिरा जवळ त्यांना चार-पाच मोकाट कुत्र्यानी चावा घेतला.यात ते गंभीर जखमी झाले.घराची परिस्थिती अंत्यंत हलाखीची आहे.गेल्या तीन महिन्यापासून ते घरीच असल्याने हाताला काम नाही.शिवाय या वयात आता त्यांचे शरीर साथ देत नसल्याने त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यांच्या घरी पती-पत्नी असे दोघेच असून त्यांना मुल- बाळ नाही.सध्या ते गेवराईच्या संजय नगर भागात भाडयाच्या घरात राहतात. शिवाय त्यांना औषधी व इतर खर्चासाठी पैशाची नितांत आवश्यकता असून दानशूरांनी मदत करावी असे आवाहन पत्रकार संघटनेचे एस.एम.युसूफ यांनी केले होते.या अनुषंगाने सदरील बातमी वाचून पंचायत समिती सदस्या पूजा अशोक मोरे यांना विनंती करून मदतीचे आवाहन औरंगाबाद येथील पत्रकार तथा समाजसेवक गणेश पवार यांनी केले होते.सदरील मदत तलवाडाचे पत्रकार शेख अतिक यांच्या हस्ते कृष्णा सरोदे यांना घरपोच देण्यात आली आहे.

Comments


bottom of page