पत्रकार संपादक यांच्यावर गुन्हे दाखल च्या विरोधात निषेध
- CT INDIA NEWS

- Jul 1, 2020
- 1 min read

वार्ताहर- मनिष मुथा -लासूर स्टेशन संपादक,पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने लासुर स्टेशनच्या पत्रकारांनीं निषेध करून दिले निवेदन.....
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनो पॉझिटिव्ह रुगणांची संख्या पाच हजाराच्यावर गेल्याने सर्व प्रमुख दैनिकानीं व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बातम्या प्रसारित केल्या होत्या मात्र दै. दिव्य मराठीने याबाबत विशेष पुरवणी काढून कोरोनोमुळे आतापर्यंत जिल्यात 206 जणांचा मृत्यू झाल्याने या लोकांचा मारेकरी कोण असे छापल्याने प्रशासनातील सरकारी अधिकारी यांना चांगलेच झोबंले व दिव्य मराठीच्या संपादक,प्रकाशक,व पत्रकार यांच्यावर साथरोग अधिनियम 1897 कलम 3 (1) व भा.द.वी.500,501,505 (1)( ब)588 व 117,अंनव्ये गुन्हा दाखल केल्याने जिल्हाभरातील पत्रकारांकडून निषेध व्यक्त होत असून आज गंगापूर व लासुर स्टेशन येथील औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांनी गंगापूर तहसील व लासुर स्टेशनच्या पत्रकारांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद याना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात येऊन तात्काळ गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.
यावेळी दैनिक लोकमतचे विनोद जाधव,दिव्य मराठीचे मकसुद शेख,लोकमत समाचारचे अशोक जैस्वाल,दै.शिवना तिरचे नवलचंद कोठारी,सा.भारतवालाचे संपादक मेहमूद भारतवाला,दैनिक भास्करचे विजय क्षीरसागर,सुपरफास्ट महाराष्ट्रचे फिरोज मन्सुरी,सामनाचे श्रीराम मढिकर,इलेक्ट्रॉनिक प्रसारमधमातील स्टार महाराष्ट्रचे प्रकाश सातपुते,गाव माझा न्युज चैनलचे गुलाब वाघ आदींसह इतर पत्रकारांची उपस्थिती होती.







Comments