top of page

पत्रकार सेवा संघ व शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार.....

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 9, 2021
  • 1 min read

लासुर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी. मनिष मुथा


पत्रकार सेवा संघ व शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार.....


गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे पत्रकार सेवा संघ व शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या उपस्थितीत लासुर येथील पोलीस चौकीत कर्तृत्ववान महिलांचा शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला सर्वप्रथम महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन सर्व सामान वागणूक मिळून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाच्या अद्यक्षा पोलीस बिट अंमलदार सविता वरपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सपना गायकवाड यांनी करून प्रशासकीय सेवेत बिट अंमलदार सविता वरपे, धार्मिक क्षेत्रात डॉ.शितल अग्निहोत्री,शिलाताई कुंभकर्ण,सामाजिक क्षेत्रात सुनीता ताई पाटणी, संगीता शिवनाथ गायकवाड,रिबेरा रिचर्ड बत्तीसे, व्यवसायिकतेत इंडेन गॅसच्या संचालिका वैशाली शिंदे,राजकीय क्षेत्रात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शिलाताई भगवान गाढे,आशावर्कर,अंगणवाडी सेविका,तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठविणार्या कर्तबगार महिलांचा शिल्लेगाव पोलिसांतर्फे शाल,श्रीफळ,तर पत्रकार सेवा संघातर्फे सन्मानपत्र,पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना डॉ.शितल अग्निहोत्री,शिलाताई गाढे, सुनीताताई पाटणी, यांनी आपल्या भाषणात सर्वांचे आभार मानले तर अद्यक्षीय भाषणात बोलताना बिट अंमलदार सविता वरपे यांनी सांगितले की पोलीस विभागाची कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास तात्काळ मला संपर्क करावा कुठलीही अडीअडचणी तात्काळ दूर करून त्या समस्यावर तोडगा पोलीस विभाग काढील असे सांगितले.

दरम्यान कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर एक यशस्वी महिला उद्योजक तथा तुळजा भावना इंडेन गॅसच्या संचालिका वैशाली ताई शिंदे यांचा निवासस्थानी जाऊन पत्रकार सेवा संघाचे गंगापूर तालुका उपाद्यक्ष सर्वश्री.गुलाब पाटील वाघ,जितेंद्र लिंगायत,तालुका सचिव सपना गायकवाड,तालुका सरचिटणीस फिरोजभाई मंसुरी,तालुका सद्यस्य मनीष मूथा सल्लागार संजय शर्मा आदींनी वैशाली ताई व त्यांच्या मातोश्री यांचा शाल,पुष्प,सन्मानपत्र देऊन महिला दिनानिम्मित गौरविण्यात आले.

Comments


bottom of page