पत्रकारास शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांना दिले निवेदन....
- CT India News
- Mar 28, 2021
- 1 min read
CT INDIA NEWS लासुर स्टेशन प्रतिनिधी.मनीष मुथा
पत्रकारास शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांना दिले निवेदन....
पत्रकार सेवा संघ व लासुर स्टेशन येथील पत्रकारांच्या वतीने दिले निवेदन...
वैजापूर शहरातील जुना बसस्थानक परिसरातील पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेते दिपक बरकसे हे रोजनिशी प्रमाणे आज (ता.२७) रोजी त्यांचे वृत्तपत्र विक्रीचे काम करीत होते दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दीपक यांनी पाणी पिण्यासाठी मास्क बाजूला काढला यावेळी पेट्रोलिंग दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे हे आपल्या लवाजम्यासह त्याठिकाणी आले यावेळी त्यांनी दिपक बरकसे यांना कंबरेखालच्या (अश्लील) भाषेत शिवीगाळ केली केळे शिवीगाळ करत असताना सोबत असलेल्या इतर पोलीस कर्मचारी यांनी दिपक बरकसे हे एक जबाबदार नागरिक तथा पत्रकार आहेत असे केळे महोदय यांना सांगितले मात्र केळे हे कुठल्याही कर्मचारी यांचे म्हणणे ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते त्यामुळे पत्रकार सेवा संघ व पत्रकार बांधवातर्फ सदर अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्रकार सेवा संघ व पत्रकार बंधूंतर्फे शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर याना निवेदन देण्यात आले.
यावेळी लासुर स्टेशन मराठी पत्रकार पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्यासह पत्रकार सेवा संघाचे तालुकाउपाद्यक्ष गुलाब वाघ,तालुका सचिव सपना गायकवाड,तालुका सरचिटणीस फिरोज मंसुरी,तालुकासदस्य मनीष मूथा,दैनिक लोकमतचे रामेश्वर श्रीखंडे,भारतीय जनमत न्युजचे अनिरुद्ध भारद्वाज,दैनिक सामनाचे श्रीराम मढीकर, लोकमत समाचारचे अशोक काका जैस्वाल दैनिक शासनसम्राटचे आप्पासाहेब वंजारे,पत्रकार संजय शर्मा,सुभाष थोरात,आदींसह पत्रकार उपस्थित होते.









Comments