top of page

पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने धायरी येथील ज्येष्ठ नागरिकांच्य

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 14, 2022
  • 1 min read

पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने धायरी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात स्थानिक 150 जेष्ठ नागरिक जमले होते विद्यमान नगरसेविका अश्विनी ताई पोकळे व युवा नेते किशोर पोकळे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष वि ग सातपुते होते श्री चंद्रकांत कंरंजे यांनी सदाबहार गीते गाऊन कार्क्रमास रंगत आणली श्री किशोर पोकळे सौ.अश्विनीताई पोकळे यांनी सर्व जैष्ठ नागरिकासाठी कृतज्ञता व्यक्त केली व आशिर्वाद मागितले श्री प्रमोदकुमार मिसाळ यांनी ऊत्कृष्ट सुत्रसंचलन केले बोरीकर यांनी जैष्ठ is the Best कविता सादर करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले अध्यक्ष सातपुते सरांनी समयोचित मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून पद्मावती जैष्ठ नागरिक संघाच्या वाढीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या कार्याध्यक्ष श्री दिलीपराव देशपांडे यांनी अथक परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले,शहर संघटक श्री श्रीकांतजी कुलकर्णी यामेळाव्यास विशेष नियंत्रीत होते त्यांचा किशोर पोकळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला,प्रमोदकुमार मिसाळ यांनी आभार प्रदर्शन केले.सर्व नियुक्त पदाधिकार्याचे स्वागत करण्यात आले सौ संगीताताई कुलकर्णी यांच्या पसायदानानंतर भोजनोत्तर मेळाव्याची सांगता झाली या मेळाव्यासाठी श्री दिलीप देशपांडे व श्री प्रमोदकुमार मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले ,माहितीस्तव सादर टी एस बोरीकर सरचिटणीस जैष्ठ नागरिक आघाडी खडकवासला मतदार संघ

Comments


bottom of page