top of page

फुलंब्री येथे गाईचे पूजन करून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 4, 2020
  • 1 min read



प्रतिनिधी- गणेश चौधरी-औरंगाबाद "दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत असूनही राज्य शासन यावर कोणतीही ठोस उपाययोजना यावर करीत नाही. दुधाला २० रुपयांपेक्षाही कमी भाव मिळत असून हा दूध उत्पादक शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय आहे. या प्रकारचा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही."


फुलंब्री येथे गाईचे पुजन करून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.


गायीच्या दुधाला सरसकट प्रति १० रु. लिटर अनुदान, दुध पावडरला प्रति किलो ५० रु.अनुदान, मका खरेदी करणे व युरिया खत मिळण्यासाठी महायुतीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.


या वेळी माजी उपमहापौर श्री.विजय औताडे, श्री.सुहासजी शिरसाठ, सविताताई फुके, श्री.शिवाजीराव पाथ्रीकर, श्री.जितेंद्रजी जैस्वाल, योगेश मिसाळ सर्व पं.स.सदस्य, नगरसेवक सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

Comments


bottom of page