top of page

बीड : अंबाजोगाईत तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन ठार, सहा गंभीर जखमी

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 11, 2019
  • 1 min read

ree

बीड :- बीडमधील अंबाजोगाई येथे तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.  अंबाजोगाई-लातूर रोडवर शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र या अपघातातील मृत दोघंही एकाच घरातील असल्याची प्राथमिक माहीत आहे. परिणामी, परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास  अंबाजोगाई-लातूर रोडवर नंदगोपाल दूध डेअरीजवळ दोन कार आणि एका रिक्षात हा विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन जण जागीच ठार झाले, तर अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Comments


bottom of page