top of page

बांधकाम कामगारांच्या येणाऱ्या पिढीच्या हाता

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 29, 2022
  • 2 min read

*चाळीसगाव त्ता. प्रतिनीधी : विकी पानकर


*बांधकाम कामगारांच्या येणाऱ्या पिढीच्या हातात कामगारांच्या पेट्या नाही तर पुस्तकांच्या पेट्या आल्या तर मला जास्त आनंद होईल - आमदार मंगेश चव्हाण

*

चाळीसगाव तालुक्यातील ६७ बांधकाम कामगारांना सुरक्षा पेट्यांचे आमदार कार्यालयात वाटप



दि.२८ - ग्रामीण भागातील कष्टकरी कामगार हा अतिशय हलाखीत आपला संसारगाडा ओढत असतो. मात्र वर्षानुवर्षे कष्ट करून देखील त्यांची परिस्थिती बदलत नाही. यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीने शिक्षण घेऊन प्रगती केली तरच त्यांची परिस्थिती बदलू शकते. यासाठी येत्या काळात कामगारांच्या मुलांच्या हातात कामाच्या पेट्या नाही तर पुस्तकांच्या पेट्या आल्या तर मला जास्त आनंद होईल व त्यासाठी आमदार म्हणून नव्हे तर कष्टकऱ्यांच्या कुटुंबातील एक घटक म्हणून सदैव मदत करणार असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

चाळीसगाव तालुक्यातील ६७ बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पं.स. गटनेते संजय तात्या पाटील, मार्केट कमिटी माजी सभापती सरदार शेठ राजपूत, मार्केट कमिटी माजी उपसभापती किशोर भाऊ पाटील, माजी नगरसेवक आनंद खरात, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पं. स.सदस्य सुभाष पाटील, सरपंच उपखेड महेश मगर, सरपंच चिंचगव्हाण एस के राठोड सर, सरपंच तामसवाडी शिवदास पाटील, पातोंडा सरपंच बापू, लोंजे ग्रामपंचायत सदस्य बळीराम चव्हाण, रवींद्र पाटील, भाजपा सोशल मीडिया प्रमुख बाजीराव अहिरे, मोहन गुजर, विजय पाटील

सूत्रसंचालक तथा भाजपा शहर सरचिटणीस अमोल नानकर आदी उपस्थित होते.


यावेळी पंचायत समिती गतनेते संजय पाटील म्हणाले की, बांधकाम कामगारांना एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आपली रोजंदारी सोडून अनेक दिवस चाळीसगाव- जळगाव फेऱ्या माराव्या लागतात. यात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून गेल्या २ वर्षांपासून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ३ हजार हुन अधिक बांधकाम कामगारांना त्यांच्या विविध योजनांचा लाभ हा कुठल्याही प्रकारच्या फेऱ्या न मारता व एक रुपयाही त्यांच्याकडून न घेता दिला गेला. त्यांच्या एका कामगारा मागचा १०० रुपये पर्यंतचा शासकीय खर्च हा आमदार कार्यालयाच्या मार्फत केला जात असल्याने या कामाची आपण जाणीव ठेवावी अशी देखील अपेक्षा त्यांनी मनोगतातून व्यक्त केली...,

Comments


bottom of page