top of page

बोलठाणहुन नगरकडे जात आसताना रेशनमाल घेवुन जाणारा टेम्पो शिल्लेगाव पोलीसांनी ताब्यात घेतला ....

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 24, 2021
  • 1 min read

CT INDIA NEWS लासुर स्टेशन प्रतिनिधी. मनिष मुथा



बोलठाणहुन नगरकडे जात आसताना रेशनमाल घेवुन जाणारा टेम्पो शिल्लेगाव पोलीसांनी ताब्यात घेतला ....


गंगापुर तालुक्यातील लासूर स्टेशन: राशन चा तांदूळ

गव्हु काळ्या बाजारात घेऊन जात असलेला टेम्पो अहमदनगर येथे विक्रीसाठी जात असताना लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पकडून टेम्पोसह त्यामध्ये 80 गोण्या तांदूळ, 26 गव्हाच्या गोण्या ताब्यात शिल्लेगाव पोलीसांनी ताब्यात घेतला

शिल्लेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथून राशनचा तांदूळ गव्हु माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती शिल्लेगाव पोलीसांना खबर्या कडून मिळाली होती यांची शिल्लेगाव पोलीसांनी दखल घेत सापळा रचला होता लासूर स्टेशन येथील बाजार समिती समोर अहमदनगर कडे जात असताना दि 23 मंगळवार रोजी तिन वाजेसुमारास टेम्पो ४०७. टेम्पो नंबर एम एच १५ , बी. जे. ३२४५. पकडला चालक अक्षय सुखदेव मोगल (रा साकेगाव ता वैजापूर जि औरंगाबाद) असे चालकाचे नाव आहे चालक अक्षय याच्या सांगण्यावरून किसनलाल कोठारी (रा बोलठाण, ता नांदगाव, जि नाशिक) यांचा माल आहे अशी कबुली दिली या टेम्पोत 80 गोण्या तांदूळ, 26 गोण्या गव्हु सह टेम्पो शिल्लेगाव पोलीस ठाण्यात जमा केला असून गंगापूर तहसील कार्यालयाला शिल्लेगाव पोलीसांनी माहिती दिली असून तहसील विभागाचे अधिकारी आल्यावर पंचनामा होणार आहे हि कार्यवाही शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक अमोल ढाकणे,पो नाईक मनोज औटे सह पोलीस पथकाने केली आहे

Comments


bottom of page