top of page

बचत गटांच्या महिलांसाठी ई-आर्थिक साक्षरता प्रशिक्षण

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 28, 2020
  • 1 min read

ree

जिंतुर - प्रतिनिधी- राम रेघाटे

बचत गटातील महिलांसाठी ई-आर्थिक साक्षरता प्रशिक्षण*

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) परभणी अंतर्गत एकता लोकसंचलित साधन केंद्र, जिंतूर शहरी व ग्रामिण बचत गटातील महिलांना इंटरनेटच्या सहायाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन १९ सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आले.

सदरील प्रशिक्षणास श्रीमती निता अंभोरे (जिल्हा समन्वय अधिकारी माविम परभणी) , उदय पिंगळे वरिष्ठ साधन व्यक्ती, मुंबई अशोक सुर्वे साधन व्यक्ती खारघर मुंबई, महेश महाके ICICI बॅंक प्रतिनिधी, मारोती घुगे CMRC व्यवस्थापक, जिंतूर उपस्थित होते,

महिलांनी बचत कशी करावी, बचतीचे महत्त्व, पोस्ट ऑफिस मधील योजना, बॅंक इन्शुरन्स,बॅंक कर्जाचा वापर कसा करावा, दैनंदिन खर्च उत्पन्न चे लिखाण कसे करावे ई. बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे संचलन- मारोती घुगे, प्रास्ताविक मंदा वाकळे यांनी केले, तर आभार अशोक घुगे यांनी मानले. सदर प्रोग्राम यशस्वी करण्याकरीता लेखापाल राणी बुरकुले, सहयोगीनी प्रभावती खंदारे, माया कांबळे यांनी सहकार्य केले.

Comments


bottom of page