top of page

बदनापूर विधानसभा निवडणूक चुरशीची होणार

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 5, 2019
  • 1 min read

वार्ताहार -संतोष वाहूळे बदनापूर - विधानसभा निवडणूक होणार चुरशीची. बदनापुर: शहराचे माजी सरपंच राजेंद्र मगरे यांना उमेदवारी मिळविल्याने विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे राजेंद्र मगरे यांची उमेदवारी निश्चित होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार जाहीर केले होते. राजेंद्र मगरे यांनी आपल्या मतदार संघातील मतदारांशी संवाद साधला. राजेंद्र मगरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली.स्थानिक उमेदवार मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बबलू चोधरी व भाजपचे नारायण कुचे यांचे आव्हान असणार आहे.बदनापूर विधानसभा ही चुरशीची होणार हे नक्की.

Comments


bottom of page