भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री जगदीश मुळीक यांच्या हस्ते ..पुणे वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्नधान्
- CT INDIA NEWS

- Aug 4, 2020
- 1 min read

प्रतिनिधी- सचिन चौधरी - पुणे- वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्नधान्य किटचे वाटप ..
नगरसेविका रुपाली धाडवे आणि दिनेश उर्फ पिंटू धाडवे यांच्या माध्यमातून 50 वृत्तपत्र विक्रेता कुटुंबियांना आज अन्नधान्य किटचे वाटप भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभाग क्र.37 बिबवेवाडी भागातील वृत्तपत्र विक्रेते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे, त्यामुळे त्या गरजू कुटुंबाना आज धान्य किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेविका रुपाली धाडवे, पिंटू धाडवे, जितेंद्र पोळेकर, सुधीर गलांडे, अरविंद गोरे, वृत्तपत्र विक्रेते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.







Comments