top of page

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचि विटंबना झाली त्याविरोधात औरंगाबाद शहरात तीव्र आंदोलन

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 31, 2019
  • 1 min read

ree

औरंगाबाद :- प्रतिनिधी - अमरदिप हिवराळे आज दि 28/08/2019 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, दिल्ली गेट, औरंगाबाद येथे तामिळनाडू येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचि विटंबना झाली त्या विरोधात औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तीव्र निदर्शने करुन निषेध करण्यात आला. तामिळनाडु मधील नागाय जिह्यातील वेदरम्यण येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची क्रूर पध्दतीने विटंबना करण्यात आली. एवढे धाडस आले कुठून '' Dead Ambedkar is More Dangerous Than Alive Ambedkar " आणि त्याचा अनुभव मनुवादी पदोपदी घेत आहेत. भारतीय संविधान हे समता, स्वातंत्र, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्याच्या प्रस्तापनेचि हाक देते आणि मनुवाद्याना तेच नको आहे. त्यामूळे असे क्रूत्य मनुवादी करीत आहेत तरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची ज्यांनी विटंबना केली त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. या नियोजनबद्ध विटंबना कांडात जे जे सहभागी आहेत त्यांना आणि मास्टर माईंड यांना अशी शिक्षा (कारवाई) झाली पाहिजे कि, जेणे करून भविष्यात असे धाडस करणार नाही, करिता औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने झालेल्या घटनेचा तीव्र निषेध, निदर्शने करण्यात आली,निदर्शने करण्याकरीता डॉ.अरुणजी शिरसाट, हरचरणसिंगजी गुलाटी, अनिता ताई भंडारी, शिरिष चव्हण, सुशिल भालेराव, उत्तम दणके, सुनील साळवे, विजय चौधरी बॉन्ड, अमर हिवराळे(पँथर), यादव अहिरे, गौतम नरवडे, अजय अभंग, राहुल वाहुळ, कैलास साळुंखे, धर्मेंद्र जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


bottom of page