भराडी येथिल एकाच कुटूंबातील (परिवारातील) नऊ जण आहेत उच्चपदी...
- CT INDIA NEWS

- Jul 1, 2020
- 1 min read
वार्ताहर-सचिन चौधरी (शेंदूरणी)
एक आदर्शवत कुटुंब खान्देशातील तेली समाजातील भराडी ता. जामनेर जि. जळगाव येथील स्व. मधुकर रामकृष्ण चौधरी श्री शंकर चौधरी , श्री रमेश चौधरी व श्री अशोक चौधरी यांचे कुटुंब गेल्या ५० वर्षापासून एकत्र कुटुंब असून समाजातील एक आदर्श कुटुंबाचे हे उत्तम उदाहरण आहे भराडी येथील माजी सरपंच श्रीमती कमलाबाई मधुकर चौधरी व श्री शंकर रामकृष्ण चौधरी यांच्या प्रेरणेने एकत्र कुटुंबातून शेती व्यवसायातून, काबाड कष्ट करून त्यांनी मुलांना शिक्षित केले. त्याच बरोबर सुनांना देखील कोणताही भेदभाव न करता नोकरीसाठी परवानगी दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच नुकत्यात तहसीलदार पदी निवड झालेल्या सौ.चारुशीला चौधरी याच कुटुंबातील स्नुषा आहेत. नाशिक येथील सरकारी रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ.प्रमोद चौधरी हेदेखील याच कुटुंबातील .शिरूर जि. पुणे येथील आरोग्य अधिकारी शरद चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागातील योगेश चौधरी, जामनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता धनराज चौधरी ,नाशिक येथील डॉ.सौ . स्नेहल चौधरी ,वाकोद येथील शिक्षिका सौ ज्योती चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक सौ मनीषा चौधरी अंमळनेर नपा.मधील परिचारिका श्रीमती मीना चौधरी हे सर्व ह्याच आदर्श कुटुंबातील सदस्य. स्वतः अशिक्षित असून मुलांनी शिकून मोठे व्हावे, हे स्वप्न मनात घेऊन मुलांसह सुनांना मोठ्या उच्चपदावर त्यांनी स्थान मिळवून दिले. ह्या कुटुंबातील एक मुलगा शिवाजी चौधरी हा आदर्श शेतकरी म्हणून शेती व्यवसाय करीत आहे. कुटुंबा सोबतच भराडी गावाला देखील त्यांनी अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख मिळवून दिली याचा समाजाला सार्थ अभिमान आहे. या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले श्री शंकर चौधरी व सर्वांसमोर एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श ठेवणाऱ्या खरोखर आदर्श असलेल्या आदर्श माता श्रीमती कमलबाई शंकर चौधरी यांना खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री कैलास आधार चौधरी सचिव श्री रविंद्र जयराम चौधरी कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी व सर्व पदाधिकारी यांच्या वतीन त्रिवार मानाचा मुजरा...! 🙏🙏🙏









Comments