top of page

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 11, 2022
  • 1 min read

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 

          मुंबई, दि. 10 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. 

            विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. ‘क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणाचे कार्य अमूल्य असेच आहे. या कार्यातून घडलेल्या कर्तबगार अशा स्त्रीशक्तीने महाराष्ट्राच्या जडणघडणीतही मोठे योगदान दिले आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

Comments


bottom of page