मा .खासदार श्री डॉ भागवत कराड साहेब यांची लासुर स्टँशन कृषी उत्पन्न बाजार समिती ला भेट
- CT INDIA NEWS

- Sep 9, 2020
- 1 min read

* CT INDIA NEWS प्रतिनिधी मनिष मुथा लासूर स्टेशन ....*
*मा .खासदार भागवत कराड यांची लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट....*
मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार भागवत कराड, जिल्हा सरचिटणीस मोहन अप्पा आहेर,जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे, यांनी लासुर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यलयाला सदिच्छा भेट दिली त्याप्रसनगी त्यांचा सत्कार बाजार समिती व भाजपच्या शहर शाखेच्या वतीने करण्यात आला.
डॉ.भागवत कराड हे दहेगाव येथे माजी खासदार कै.रामकृष्ण पाटील यांच्या दहेगाव येथील निवासस्थानी भेटीसाठी गेले होते त्यामुळे येताना बाजार समितीचे संचालक मनीष पोळ यांच्या आग्रहाखातर त्यांनी लासुर स्टेशन बाजार समितीच्या कार्यलयाला भेट देऊन बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमालाची आवक जावक याची माहिती घेतली व बाजार समिती चालवत असलेल्या पेट्रोल पंप व नियोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स याचीही माहिती घेतली व बाजार समिती प्रशासना चे कौतुक केले.
दरम्यान बाजार समितीचे उपसभापती दादा पाटील जगताप,सर्वश्री संचालक सुरेशभाऊ जाधव,सुनील पाखरे,मनीष पोळ,सोपान बोरकर,वाल्मिक चव्हाण,साईनाथ तायडे,महेंद्र पांडे,स्वरूपचंद कुकलारे,भाजपचे शहर अध्यक्ष
संतोष काळे ,सचिन पांडे,वारकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष कडूबाळ महाराज गवांदे,गणेश जगताप,पुंडलिक पाटेकर,गौतम नाहाटा, राजेश चव्हाण,अशोक घोलप,शरद जगताप यांच्यी उपस्थित होती.







Comments