मा. गिरीश भाऊ महाजन सप्रेम नमस्कार
- CT India News
- Apr 29, 2021
- 1 min read

माननीय गिरीश भाऊ महाजन सप्रेम नमस्कार,🙏 तुम्ही नुकतीच पहूर येथील सिविल हॉस्पिटल ला भेट दिली, तर त्या ठिकाणी तुम्हाला आढळले की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, बॅड नाही ऑक्सिजनची सुविधा नाही लागणारे औषधी वेळेवर मिळत नाही अजून बर्याचश्या गोष्टी आहे की त्या सर्व गोष्टींचा तुटवडा आहे, हे तुम्ही सुद्धा स्वतः मान्य केले आहे,मग तुम्ही पंचवीस-तीस वर्षापासून आमदार आहात तुम्ही एवढे दिवस काय केलेत, आणि आज आपलं सरकार विरोधी पक्षाच्या ताब्यात गेल्यावर तुम्ही म्हणतात की मी सरकारला जाब विचारेल, तुम्ही स्वतः मंत्री असताना जर या सर्व सुविधा करून ठेवल्या असत्या तर आज पेशंटला बाहेर गावाला न्यायाची गरज नसते, सुविधा नसल्यामुळे काहींचा तर मूत्यूसुद्धा झालेला आहे, तर या सर्व गोष्टींना चालू सरकार नाही तर तुम्ही, तुमचं सरकार जबाबदार आहे, संपूर्ण जामनेर तालुक्यात एकाही सिव्हिल हॉस्पिटल ला व्यवस्थित सुविधा नाही, पंचवीस ते तीस वर्ष आमदार होऊन काय केलं तेच कळत नाही, कोणी मेला की त्यांच्या फक्त मैतीवर जायचं आणि त्यांचे मन जिंकले, हेच काम तुम्ही आतापर्यंत केलेले आहे, तुम्ही चांगले काम सुद्धा केलेल्या आहेत हे मी मान्य करतो, त्या चांगल्या कामाबद्दल मी तुमचे आभार मानतो🙏परंतु पंचवीस-तीस वर्षे मंत्री राहून आमदार राहून जशी कामे व्हायला पाहिजे होती तसे आज पर्यंत झालेली नाहीये🙏🙏🙏







Comments