top of page

माजी स्थायी समिती सभापती कैलास काळू चौधरी यांचे दातृत्व धुळे तेली समाज भवनाकरिता दिली एक एकर जागा व

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jul 7, 2021
  • 2 min read

माजी स्थायी समिती सभापती कैलास काळू चौधरी यांचे दातृत्व

धुळे तेली समाज भवनाकरिता दिली एक एकर जागा विनामुल्य


धुळे - धुळे शहरात बऱ्याच दिवसापासून तेली समाजाचे एक स्वत : चे मोठे समाज भवन असावे अशी भावना होती या उद्देशाने धुळे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी यांनी आपल्या स्वमालकी सुमारे एक एकर जागा तेली समाज युवा आघाडीचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी यांच्याकडे कोणताही मोबदला न घेता विनामुल्य देत असून त्यांनी तेली समाजाची एक समिती तयार करुन ती जमीन लवकरात लवकर ताब्यात घ्यावी. त्यांच्या या घोषणेचे समाजातील सर्वच स्थरातील लोकांनी स्वागत केले . तेली समाजाच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार , प्रदेश महासचिव डॉ . भूषण कर्डिले , समन्वयक सुनिल चौधरी , युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी , काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष युवराज करनकाळ , मजूर फेडरेशनचे माजी सभापती राजेंद्र महाले , सतिष महाले , शशिकांत चौधरी , अनिल अहिरराव , हॉटेल शितलचे मालक मोतीलाल चौधरी , सेवा आघाडीचे सुभाष जाधव , वि.अध्यक्ष संजय चौधरी , गिरीश चौधरी, रमेश करनकाळ, खान्देश मंडळ अध्यक्ष कैलास चौधरी , रविंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरची घोषणा कैलास काळू चौधरी यांनी केली . यावेळी कैलास चौधरी म्हणाले की , मी माझ्या मालकीची वडेल रस्त्यांवरील एक एकर जमीन तेली समाज भवनासाठी युवा आघाडी प्रदेश महासचिव , तेली समाजाचे उदयोन्मुख युवा नेतृत्व नरेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समाजासाठी विनामुल्य त्यांच्याकडे सपुर्द करेन त्यांनी तेली समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून सर्व सोयींनी युक्त भव्य समाज भवन उभारावे त्याकरिता आणखी काही मदत लागल्यास किंवा जागा कमी पडल्यास मी देण्यास तयार आहे मला खात्री आहे की , नरेंद्र चौधरी अत्यंत पारदर्शीपणे समाज भवन उभारतील त्याकामी आम्ही सर्व त्यांच्या सोबत तनमनधनाने खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली . तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष , तेली समाजाची बुलंद तोफ गजानन नाना शेलार म्हणाले की , एक एकर जागा समाजाला देणे यासाठी मोठे दातृत्व / दानत लागते ती आमच्या महासभेच्या जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी यांनी दाखवून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे . मी त्यांचे जाहिर अभिनंदन करुन सत्कार करतो व त्यांच्या दातृत्वाला सलाम करतो . आता काही विघ्नसंतोषी लोकं म्हणतील जागा लांब आहे एवढ्या लांब कोण जाईल . बांधवांनो, लग्न कुठे का असेना समाज बांधव लग्नाला जातो की नाही मग असे बहाणे करुन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करु नये चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीमागे सर्व समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे त्यांना आपल्या परीने मदत करुन प्रोत्साहन दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी म्हणाले की , कैलासभाऊ चौधरी यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली असून आम्ही निश्चीत त्यांच्या संकल्पनेप्रमाणे भव्यदिव्य समाज भवन पारदर्शकपणे काम करून उभारु व या समाजभवनाचे नाव कोण्या एका व्यक्तीच्या नावे नव्हे तर आपले आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज भवन या नावाने तयार केले जाईल यासाठी लवकरच तेली समाजातील एक सर्वसमावेशक समिती तयार करण्यात येईल . सर्व लहान थोर व्यक्तींच्या सुचनांचा आदर केला जाईल . याठिकाणी देणगी देणाऱ्या देणगीदारांचा उचित सन्मान केला जावून सर्वांना सारखाच मान सन्मान राखला जाईल . याकामी सर्वच स्तरातील बंधु - भगिनींनी आपआपल्या परिने योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्रातील तेली समाजाचे एक आदर्श भवन निर्माण करु असा संकल्प नरेंद्र चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला .

Comments


bottom of page