top of page

मित्राचा नांद लय खुदा मित्रा साठी लावले बेनर मित्रा ला लागली नोकरी आणिकाय पगार पण केला बेनर मध्ये ऍड

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 8, 2020
  • 1 min read

ree

प्रतिनिधी - मीना परळकर सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर झाल. देशातसोबतच अख्ख जग ठप्प झालं. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा गाव गाडा ठप्प झाला. त्यात अनेकांची नोकरी गेली. शहरात राहणारी तरुण मुलं गावाकडे परतली. अनेकांना तर आजही नोकरी मिळाली नाही. अशातच माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावातील विशाल बारबोले या तरुणाला साखर कारखान्यात चांगल्या हुद्यावर पाच आकडी पगारी नोकरी मिळाल्याने गावातील मित्र परिवाराने मुख्य चौकात मोठा फलक लावुन आनंद साजरा केला..

माढा तालुक्यातील दारफळ गावचा रहिवासी असलेल्या विशालने दहावी उतीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स पुर्ण केला होता...

पिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर्स येथे विशाल कर्मचारी नोकरीस लागला. अनेक वर्ष काम देखील केले. मात्र, तिथे मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता.

तो मोठा पगार आणि हुद्याच्या तो शोधात असायचा. अशातच मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या औदुंबरराव पाटील साखर कारखान्यात कर्मचारी भरती निघाली आणि विशाल तिथे गेला. क्रेन ऑपरेटर पदी निवड झाली.

अनेक वर्ष मोठ्या पगारासाठी धडपडत असलेल्या आपल्या जिवलग मित्राला नोकरी लागल्याचे समजताच मित्र परिवाराने त्याचा गावातील मुख्य चौकात पगाराची रक्कम लिहुन अभिनंदनाचा मोठा फलक लावला. हा आगळावेगळा फलक गावासह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. 'मित्राला चांगली नोकरी मिळाल्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी असा फलक लावला आहे', असं श्रीकांत आतकरेने सांगितलं.

Comments


bottom of page